किशोर साहू, मौदा :- चाचेर-निमखेडा जि प सर्कल अंतर्गत येणाऱ्या येसंबा येथे शारदा उत्सव सुरू असून, उत्सव सुरू असलेल्या सभामंडपाला सर्कलचे भाजपाचे भावी जि प चे उमेदवार संकेत झाडे सह मान्यवरांनी भेट दिली. यंदा मौदा तालुक्यासह ,जिल्ह्यात व राज्यात कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासणार आहे. पाणीटंचाईची झळ सौम्य स्वरूपात राहण्यासाठी हिवाळ्यात व उन्हाळ्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची मागणी याप्रसंगी संकेत झाडे यांनी शारदेमातेला केली आहे.
याप्रसंगी खंडाळा (गांगणेर) सरपंच, गांगणेर आरोग्य उपकेंद्र आरोग्य सभापती, भाजपा किसान आघाडी जिल्हा महामंत्री व जिल्हा परिषद चे भाजपाचे भावी उमेदवार संकेत झाडे, माजी पं स मौदा उपसभापती व जिल्हा परिषद चे भाजपाचे भावी उमेदवार खेमराज चाफले, येसंबा उपसरपंच धनराज हारोडे, पोलीस पाटील नरेंद्र राऊत,मंगेश चाफले, हिरा चकोले सह ग्रामस्थ उपस्थित होते.






