spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

घाटंजी येथे ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या

– भाड्याने राहात असलेल्या खोलीत लावला गळफास

घाटंजी (यवतमाळ) :- तालुक्यातील एरंडगाव व इंझाळा ग्रामपंचायतीत कार्यरत ग्रामपंचायत अधिकाऱ्याने (ग्रामसेवक) घाटंजी येथे भाडेतत्वावर घेतलेल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

अमोल रामदास जंगमवार (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मूळचे पाटणबोरी येथील रहिवासी होते. भाड्याने खोली घेऊन घाटंजी येथे प्रोफेसर कॉलनीत राहत होते. रविवारी त्यांच्या घरच्या लोकांनी मोबाइलवर कॉल केला. पण प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ओळखीच्या व्यक्तीला खोलीवर जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी अमोल जंगमवार हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सायंकाळी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जंगमवार हे शनिवारी अमरावती येथे कार्यशाळेसाठी गेले होते. तेथून रात्री १० वाजता परत आले, अशी माहिती प्राप्त झाली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, अडीच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

Popular Articles