कन्हान :- आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान शहर द्वारे तारसा रोड आदिवासी गोवारी शहिद स्मारक येथे गोवारी शहिद दिवसा निमित्त आदिवासी गोवारी ११४ शहिद बांधवाना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.
सोमवार (दि.२३) नोहेंबर २०२६ ला आदिवासी गोवारी शहिद स्मारक तारसा रोड कन्हान येथे आदिवा सी गोवारी ११४ शहिद बांधवाना श्रद्धांजली कार्यक्रम भास्कर राऊत यांचे अध्यक्षेत आणि प्रमुख अतिथी कन्हान नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिंकेश चवरे, नगरसेविका सुषमा चोपकर, पुनम राठी, सुनंदा दिवटे, सुमित्रा माटे, रेखा टोहणे, योगिता भलावी, संगिता वांढरे, नगरसेवक केतन भिवगडे, शिवशंकर (चिंटु) वाकुडकर, हरिष तिकडे, प्रशांत पाटील आदि मान्यवरांचा हस्ते कांद्री-कन्हानचे शहिद तारांचद भोंडे व कामठीची करुणा नेवारे यांच्या प्रतिमेला व शहिद स्मारकावर पुष्पहार आणि पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात नागपुरात (दि.२३) नोव्हेंबर १९९४ रोजी घडलेल्या घटने बाबत मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन आदीवासी गोवारी ११४ शहिदांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. तदंतर कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित समाज बांधवांनी आणि नागरिकांनी शहिद तारांचद भोंडे, करुणा नेवारे यांच्या प्रतिमेस व शहि द स्मारकावर पुष्प अर्पित करुन दोन मिनट मौनधारण करून ११४ गोवारी शहिद बांधवाना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंद सहारे यांनी तर उपस्थितांचे आभार अरविंद नेवारे यांनी व्यकत केले. यावेळी नेवालाल सहारे,शंकर राऊत, मारोती गाते, अनिल ठाकरे, गणेश राऊत, हेमराज लसुंते, वसंता राऊत, रेषाजी गाते, दिलीप राऊत, सुरेंद्र शेंदरे, प्रदीप भोंडे, नरेश कोहळे, अजय चव्हाण, गज्जु गोरले, शरद वाटकर, छोटु राणे, प्रदीप गायकवाड, दिगांबर हारगुडे, वंदना शेंदरे, लक्ष्मी सहारे, आदी सह समाज बांधव आणि मान्यवर नागरिक बहु संख्येने उपस्थित होते. कन्हान च्या कार्यक्रमानंतर येथील आदीवासी गोवारी बांधव नागपुर येथे जावुन आदिवासी गोवारी समाज संघटन कन्हान शहर द्वारे ११४ गोवारी शहिद स्मारकावर पुष्पहार व पुष्प अर्पण करून गोवारी शहिदांना भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समस्त समाज बांधवांनी परिश्रम घेत सहकार्य केले.






