spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“ धरमपेठ झोनमध्ये अतिक्रमण विभागाची दहा झोन मिळून संयुक्त कारवाई मध्ये आयुक्त यांची धडक भेट ”

नागपूर :- नागपूर महानगरपालिका धरमपेठ झोन क्र. ०२, अंतर्गत दि. 27/11/2026 रोजी नागपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज नगर, शंकर नगर,गोकुळपेठ, सिताबर्डी, धंतोली तसेच धरमपेठ मधील सर्व मुख्य रस्ते व चौक येथे नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन व सर्व दहा झोन अंतर्गत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत शहरातील इतर दहाही झोनची पथके सहभागी झाली होती. संयुक्तरीत्या राबविण्यात आलेल्या या मोहिमे दरम्यान फुटपाथवर अतिक्रमण करून परिसरातील सर्व अनधिकृत शेडचे बांधकाम पाडून रस्ते व पदपथ मोकळे करण्यात आले.”कारवाई दरम्यान महानगरपालिका, आयुक्त यांनी अतिक्रमण घटनास्थळी उपस्थिती दर्शविली. या कारवाईमुळे फुटपाथ आणि मुख्य रस्ता अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा.आयुक्त मनपा नागपूर, मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतुक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एस अधिकारी व कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते.

नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात फुटतात नागरिकांना मोकळे करुन देने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Popular Articles