देवलापार :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंदयावर कारवाई करणे कामी पेट्रोलीग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे नमुद पथकाने तागला पुसदा ते फुलझरी रोड परीसरात नाकाबंदी केली असता विनाक्रमांकाचा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर मुंडा व ट्रॉली मिळुन आली. नमुद वाहनाची पंचासमक्ष तपसाणी केली असता त्यात रेती आढळुन आली. वाहन चालक १) कार्तिक कुडलिक उईके, वय २१ वर्ष, रा. सालाई ता. रामटेक हा मिळुन आला. नमुद आरोपीला रेती वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याबाबत माहीती प्राप्त झाली. वाहन मालक २) मिथुन हरी मेहर, रा सालई, ता. रामटेक जि. नागपुर याचे सांगण्यावरून चालक आरोपीने अवैधरित्या रेतीची वाहतुक केल्याची माहीती प्राप्त झाली.
पोलीसांनी पंचासमक्ष आयशर कंपनीचा ट्रॅक्टर मुंडा व ट्रॉली किमती ५,००,००० /- रूपये आणि एकुण १ ब्रास रेती असा एकुण किंमती ५,०५,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद वाहन चालक आणि मालक यांच्या विरूध्द कलम ३०३ (२), ४९ भा.न्या.सं सहकलम ४८ (७), ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सहकलम ४, २१ खाण खनिज अधिनियम सह कलम सहकलम ३ (१८१),५० मो. वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






