spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

२०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित होणार?

मुंबई :- राज्यातील सरकारी जमिनीवरील 2011 पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला राज्य सरकारने मोठा वेग दिला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी विधानसभास्तरीय आढावा समितीच्या सहअध्यक्षांची नियुक्ती केली असून, राज्यात 115 सहअध्यक्षांच्या नियुक्तीचा अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो सर्वसामान्य कुटुंबांच्या डोक्यावरील बेघर होण्याची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. तसेच, वर्षानुवर्षे सरकारी जमिनीवर वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना त्यांच्या घरांचा कायदेशीर मालकी हक्क मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शासनाच्या या लोककल्याणकारी निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे व्हावी, यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा समित्यांवर 115 सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे प्रलंबित प्रकरणे मार्गी लागून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

फ्लॅटधारकांना मिळणार डिजिटल प्रॉपर्टी कार्ड; सात कोटी नागरिकांना दिलासा

आणखी एक क्रांतिकारी निर्णय म्हणजे राज्यातील शहरी भागातील सदनिका धारकांना आता खिशात सहज ठेवता येईल असं डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलाय. त्यामुळे मालमत्तांचे वाद कायमचे मिटणार आहेत. जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर स्वतंत्र ओळख आणि सदनिका धारकांना कायदेशीर हक्क देणारं व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील अंदाजे सात कोटी सदनिका धारकांना दिलासा मिळणार आहे.या कार्डमध्ये फ्लॅटची कुंडली, सदनिकेवर असलेल बँकेच कर्ज, गहाणखत, मालमत्ता कर किंवा सोसायटीची थकबाकी न्यायालयीन निर्बंध किंवा शासकीय देणी असल्यास त्याची थेट नोंद संबंधित प्रॉपर्टी कार्डवर होईल. बिल्डरचं कर्ज मुख्य नोंदीवर तर वैयक्तिक कर्ज संबंधित सदनिका धारकाच्या कार्डवर दिसेल. अधिकृत बांधकाम, मंजूर नकाशा आणि संबंधित कागदपत्र असलेल्या प्रकल्पाना हे कार्ड देण्यात येईल.

फ्लॅटमध्ये राहणाऱ्या घर मालकांना देतो आहे याचा जो ड्राफ्ट आहे तो आज पब्लिक डोमेनमध्ये महसूलच्या पब्लिक डोमेनमध्ये टाकतो आहे. 30 दिवस हा पब्लिक डोमेन मध्ये राहील आणि ज्या काही यामध्ये सूचना येतील हरकती येतील, त्यावर आम्ही अंतिम नियमावली पुढच्या दोन महिन्यात, एक महिना पब्लिक डोमेन, दोन महिने आम्ही आणि मग ही नियमावली तयार करून नियमामध्ये सुधारणा करून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड या राज्यामध्ये लागू होईल, अशी माहिती देखील महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आहे.

Popular Articles