नागपूर :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा व अनिल म्हस्के अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूची निर्मीती, विक्री तसेच दारूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली. सदर कारवाईदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये एकूण ३२ गुन्हे दाखल करण्यात आले.
सदर कारवाईमध्ये पोलीस स्टेशननिहाय दाखल गुन्ह्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
पोलीस स्टेशन उमरेड येथे ०२ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन भिवापुर येथे ०२ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन केळवद येथे ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन खापा येथे ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन कोंढाळी येथे ०२ गुन्हे नोंद पोलीस स्टेशन नरखेड येथे ०३ गुन्हे नोंद पोलीस स्टेशन जलालखेडा येथे ०२ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन काटोल येथे ०४ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन देवलापार येथे १२ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन रामटेक येथे ०१ गुन्हा नोंद पोलीस स्टेशन अरोली येथे ०१ गुन्हा नोंद असे एकुण ३२ गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
सदर कारवाईत एकुण १४०० मिली देशी दारू, २० मोहाफुल दारू, १००० लिटर मोहाफुल सडवा आणि साहित्य असा एकुण ५१,१४०/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. तसेच नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला.






