नागपूर 1 : पोलीस अधिक्षक कार्यालय, नागपूर ग्रामीण येथील पोलीस भवनात दिनांक ३० जून २०२५ रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सत्कारप्राप्त अधिकारी व अंमलदारांमध्ये पोउपनि दिलीप पुसाराम बासोडे (नियंत्रण कक्ष), पोउपनि गजानन दशरथ कंगाले (पोलीस स्टेशन काटोल), श्रेणी पोउपनि उत्तम कन्हैयालाल दास व अशोक ओंकार धांडे (मोटर परिवहन विभाग), देवा लक्ष्मण नागोसे (पोलीस स्टेशन मैदा), सहायक फौजदार ओंकार नथ्थुजी डाहारे (पोलीस स्टेशन कुही), दिलीप घनश्याम सुर्यवंशी (पोलीस स्टेशन उमरेड), व श्याम बिरबलदास महंत (नियंत्रण कक्ष) यांचा समावेश होता. कार्यक्रमात धुमाळ यांनी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या यशस्वी सेवेसाठी शुभेच्छा देत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि सुखद आयुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी मानव संसाधन शाखेच्या पोउनि जोत्स्ना गिरी तसेच शाखेचे अंमलदार उपस्थित होते.




