spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तीन वर्षीय चिमुकलीवर २७ वर्षीय नराधमाचा अत्याचार, नराधमाने विश्वासाचा केला विश्वासघात

खापा :- गेल्या काही दिवसांपासून लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. खापा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बडेगाव जवळील चारगाव येथे गुरुवार दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका तीन वर्षाच्या चिमुकल्या चिमुरडीवर नराधमाने लैंगिक अत्याचाराची घटना घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुकलीची आई ही शेतात कामाला गेली असता, मुलीला सांभाळण्याची जबाबदारी त्या नराधमाला देऊन गेली. मुलीचे वडील हे नागपूर शहरात एका खाजगी हॉटेलमध्ये काम करतात. सुट्टीच्या दिवशी एखाद्या वेळेला ते गावाला येत असतात. आरोपी हा घरा शेजारीच राहत असतो. या जबाबदारीचा गैरफायदा उचलत आरोपी बाप्या उर्फ भीमराव शिवाजी किरनाके, वय 27 वर्ष, रा. चारगाव पो. बडेगाव, ता. सावनेर याने तीन वर्षाच्या चिमुकलीवर दुपारी अकरा ते पाचच्या दरम्यान मुलीच्या राहते घरी तिच्यावर अत्याचार केले.

सायंकाळी मुलीची आई शेतातून घरी परतल्यावर लघवीच्या जागी दुखत आहे असे आईला सांगितले. मुलीने आईला सांगितले की मला लघवी आली आहे. आईने लघवीला नेले असता मुलीने रडत रडत आईला हकीकत सांगितली.

फिर्यादी यांनी घटनेची माहिती सकाळी १९ डिसेंबर शुक्रवारला खापा पोलिसांना दिली. खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे यांनी त्वरित घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्या चमूसह घटनास्थळ गाठत आरोपी बाप्या उर्फ भीमरावला सकाळी त्वरीत त्याच्या राहत्या घरून अटक केले. नराधमाच्या अत्याचारामुळे प्रकृती अस्वस्थ झाल्याने चिमुकलीला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी खापा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रकीया सुरू आहे.

Popular Articles