spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

Synergy Fitness रामदासपेठ शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा

– सिनर्जी फिटनेस ही केवळ जिम नसून आरोग्य, शिस्त आणि परिवर्तनाची चळवळ आहे : अंजिक्य वखरे

नागपूर :- १९ डिसेंबर नागपूरच्या फिटनेस क्षेत्रात एक ऐतिहासिक क्षण साकार होत असून सिनर्जी फिटनेस जिम च्या रामदासपेठ शाखेचे भव्य उद्घाटन २० डिसेंबर रोजी संपन्न होत आहे.

विशेष बाब म्हणजे, नागपूरच्या इतिहासात प्रथमच एका फिटनेस ब्रँडच्या एकाच वेळी तीन शाखा कार्यरत आहेत. ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. Synergy Fitness ही केवळ जिम नसून आरोग्य, शिस्त आणि परिवर्तनाची चळवळ आहे. अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी प्रशिक्षक, वैयक्तिक प्रशिक्षण व्यवस्था आणि सर्वसमावेशक फिटनेस दृष्टिकोन यामुळे Synergy Fitness अल्पावधीतच नागपूरकरांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे. या ब्रँचचे संस्थापक अजिंक्य वखरे यांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि समर्पणामुळे Synergy Fitness आज वेगाने विस्तारत आहे. “नागपूरकरांना जागतिक दर्जाच्या फिटनेस सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे,” हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

रामदासपेठ शाखेच्या उद्घाटनासह सिनर्जी फिटनेस चा प्रवास आणखी सशक्त होत असून, नागपूरच्या फिटनेस संस्कृतीला नवी दिशा देणारा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Popular Articles