spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ब्रह्मपुरी आशिष मधुकर पारधी आणि सुरज मधुकर पारधी ब्रह्मपुरी यांच्यावर गुन्हा दाखल !

– बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेल्या अप्रमाणित वजन-मापांवर जप्ती कारवाई

नागपूर :- श्री साई स्केल कंपनी, नागपूर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 01 जून 2026 रोजी, वैधमापनशास्त्र विभाग व पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त पथकाने आरोपी आशिष मधुकर पारधी व सूरज मधुकर पारधी यांच्या मालकीच्या एस.ए.आय. वेइंग सर्व्हिसेस, साई इलेक्ट्रॉनिक्स स्केल तसेच एस.ए.सर्व्हिसेस, ब्रह्मपुरी या आस्थापनांवर धाड टाकून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनांमध्ये नॉन- स्टँडर्ड, फॅब्रिकेटेड व मंजूर मॉडेल नसलेले वजन काटे व वजन-मापे तयार करून श्री साई स्केल कंपनीच्या मालकीचे टीएम सनसुई या ब्रँडची बनावट स्टिकर तयार करून नॉन स्टॅंडर्ड वजने मापावर चिकटून त्यांची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अंदाजे 200 अप्रमाणित वजन- मापे व वजन काटे जप्त करून पंचनामा करण्यात आला. हा प्रकार मागील दोन वर्षापासून करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि. 16 जून रोजी आरोपींविरुद्ध कॉपीराइट कायदा, 1957 अंतर्गत कलम 63, 67 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 316 (2) व 316 (5) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून तसेच इतर तपासणी दरम्यान कलमांचा समाविष्ट करण्यात येण्याची संभावना आहे पुढील तपास सुरू आहे. यात इतर राज्यातील अवैध उत्पादक यात सामील असल्याचे समजले.

तसेच, या प्रकरणाच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातील तहसील व ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामकाजाची तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, अशा बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेल्या अप्रमाणित वजन-मापे अथवा वजन काट्यांची खरेदी करू नये. कोणत्याही व्यक्तीकडून अशा प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास किंवा संशयास्पद व्यवहार निदर्शनास आल्यास, नागरिकांनी त्काळ उपनियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग, चंद्रपूर तसेच सहनियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग, नागपूर विभाग, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.

Popular Articles