spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थेचा स्तुत्य उपक्रम; हजारो नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ

– वडोदा येथे भव्य महारोग्य शिबिर; २,४६९ रुग्णांना लाभ, ६६९ जणांना चष्मे वाटप 

कामठी, प्रतिनिधी :- महसूल मंत्री तथा नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्था, कोराडी यांच्या वतीने कामठी तालुक्यातील वडोदा येथे भव्य निशुल्क महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिबिरात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद हॉस्पिटल तसेच आशा हॉस्पिटल यांच्या डॉक्टर व तज्ज्ञांच्या माध्यमातून विविध आजारांची तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात आले.

गावासह परिसरातील हजारो गरजू नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये एकूण २,४६९ रुग्णांची नोंदणी करण्यात आली. तसेच ६६९ लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.सोबत आयुष्यमान कार्ड १७६, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या १८० रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आल्याने अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळाला.

यावेळी श्री फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, वडोदा ग्रामपंचायतीचे सरपंच राजू थोटे, उपसरपंच दत्तू हलमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान, विनोद पाटील, माजी पंचायत समिती सभापती रामकृष्ण वंजारी, भाजप जिल्हा मंत्री रमेश चिकटे, डॉ. सौरभ अग्रवाल यांच्यासह तालुका आरोग्य केंद्राचे डॉक्टर, कर्मचारी, रुग्णसेविका, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कोराडी मंदिर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण लिखनकर, जयराम मेहरकुळे व महेश बोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा गावातच उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

Popular Articles