Home Latest News माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा दिव्य आविष्कार

माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्राचा दिव्य आविष्कार

0

<p><strong>&&num;8211&semi; सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २१ जुलै रोजी दादर येथील श्री शिवाजी नाट्य मंदिरात विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम&semi; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त भक्ती&comma; अध्यात्म आणि संस्कृतीचा सुरेल संगम&semi; <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय&comma; महाराष्ट्र राज्य&comma; मुंबई यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त &OpenCurlyQuote;माऊली’ या विशेष आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार&comma; २१ जुलै २०२६ रोजी रात्री ८&period;०० वाजता श्री शिवाजी नाट्य मंदिर&comma; दादर&comma; मुंबई येथे करण्यात आले आहे&period; संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्यावर आधारित संगीतमय नाट्यप्रवास हा या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण असणार असून&comma; यावेळी विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक ज्ञान&comma; अध्यात्म आणि भक्तीच्या माध्यमातून समाजाला समता&comma; मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला&period; &OpenCurlyQuote;ज्ञानेश्वरी’&comma; &OpenCurlyQuote;अमृतानुभव’ आणि &OpenCurlyQuote;पसायदान’ या त्यांच्या अजरामर साहित्यकृती आजही समाजाला दिशा देणाऱ्या ठरत आहेत&period; &OpenCurlyQuote;दुरितांचे तिमिर जावो’ हा त्यांचा सार्वकालिक संदेश मानवकल्याणाची प्रेरणा देणारा आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;माऊली’ या संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंग&comma; त्यांचे अध्यात्म&comma; भक्तीमार्ग&comma; समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश संगीत&comma; अभिनय&comma; नृत्य आणि प्रभावी रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे&period; या कार्यक्रमातून संत परंपरेचा वैभवशाली वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून&comma; त्याचाच एक भाग म्हणून &OpenCurlyQuote;माऊली’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे&period; महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा&comma; अध्यात्माचा आणि सांस्कृतिक वैभवाचा परिचय रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे&period; संत ज्ञानेश्वरांच्या कार्याचा आणि त्यांच्या अमर संदेशाचा गौरव करणाऱ्या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षणबिंदू ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हा उपक्रम सांस्कृतिक कार्य&comma; इलेक्ट्रॉनिक्स&comma; माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड&period; आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ&period; किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे&period; महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचे&comma; सांस्कृतिक वारशाचे आणि आध्यात्मिक मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून&comma; संत ज्ञानेश्वरांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या कालातीत संदेशाचा संगीतमय अनुभव घेण्याची ही एक आगळीवेगळी संधी आहे&period; कला रसिक&comma; वारकरी&comma; विद्यार्थी&comma; संशोधक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा&comma; असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version