Home Latest News बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम राबविणार – महिला...

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात‘बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि ‘बालस्नेही प्रभाग’ उपक्रम राबविणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

0

<p><strong>&&num;8211&semi; बालकांचे आरोग्य&comma; शिक्षण&comma; सुरक्षा आणि हक्कांवर विशेष भर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong> à¤®à¥à¤‚बई &colon;- <&sol;strong> राज्यातील प्रत्येक बालकापर्यंत आरोग्य&comma; शिक्षण&comma; पोषण आणि सामाजिक सुरक्षेच्या योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात&comma; तसेच बालकांमध्ये त्यांच्या हक्क व अधिकारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी&comma; या उद्देशाने राज्यात &OpenCurlyQuote;बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि &OpenCurlyQuote;बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्य बाल हक्क आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या&period; मंत्रालयात झालेल्या बैठकीत बालकांच्या मानसिक आरोग्य&comma; मूल्यसंस्कार आणि जीवनकौशल्य विकासासाठी तयार करण्यात आलेल्या &OpenCurlyQuote;मानस’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले&period; तसेच पालघर जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या &OpenCurlyQuote;मानस’ प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य कीटचे उद्घाटनही मंत्री तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या की&comma; ५ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात विशेष अभियानाच्या स्वरूपात &OpenCurlyQuote;बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि &OpenCurlyQuote;बालस्नेही प्रभाग’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा मानस आहे&period; या माध्यमातून बालकांना त्यांच्या हक्क&comma; अधिकार आणि संरक्षणाच्या यंत्रणांची माहिती देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाणार आहे&period;<img class&equals;"alignnone wp-image-55828 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;महिलाबालविकासमंत्रीमीटिंग2&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यामध्ये गंभीर कुपोषण निर्मूलन&comma; बालविवाह प्रतिबंध&comma; एकात्मिक बाल संरक्षण योजना&comma; पोषण&comma; शिक्षण आणि बालसुरक्षा या विषयांवर ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत&period; अभ्यासामध्ये बाल सुरक्षा समित्यांची स्थापना&comma; बालस्नेही पंधरवडा&comma; बाल संसद&comma; शिक्षण व आदिवासी विकास विभागाच्या शिफारसी&comma; राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण &lpar;एनएफएचएस&rpar; आणि पोषण ट्रॅकर अहवालाचा तुलनात्मक अभ्यास&comma; तसेच बालकांमधील कुपोषण&comma; कमी वजन आणि वाढत्या अतिरिक्त वजनाच्या समस्यांचे विश्लेषण यांचा समावेश असावा&comma; असेही त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>आदिवासी भागातील सुमारे ५०० शासकीय आणि ५०० खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांसाठी बालस्नेही ग्रामपंचायत राबविताना प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करावी&period; तसेच दुर्गम आणि आदिवासी भागातील बालकांच्या गरजा लक्षात घेऊन स्वतंत्र उपक्रम आखण्याचा विचार करावा&comma; असे निर्देश त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरी भागात बालस्नेही प्रभाग राबविताना नगरविकास विभागाशी समन्वय साधून लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाड्यांची संख्या अपुरी असल्यास नवीन बालवाडी केंद्रे सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी&period; तसेच बालपंचायतींच्या माध्यमातून शिक्षणाचा अधिकार &lpar;आरटीई&rpar;&comma; बालहक्क&comma; &OpenCurlyQuote;१०९८’ चाईल्ड हेल्पलाईन आणि विविध संरक्षण यंत्रणांची माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बालकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही त्यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>बालस्नेही ग्रामपंचायतींमध्ये वर्षभरात नोंदविण्यात आलेल्या समस्या&comma; त्यावरील उपाययोजना आणि झालेल्या सुधारणांचा नियमित आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल पुढील ग्रामसभेत सादर करण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध सकारात्मक उपाययोजना राबवित आहे&period; &OpenCurlyQuote;बालस्नेही ग्रामपंचायत’ आणि &OpenCurlyQuote;बालस्नेही प्रभाग’ हे उपक्रम बालकांच्या सुरक्षित&comma; सुदृढ आणि सक्षम भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरतील&comma; असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस सचिव डॉ&period; अनुपकुमार यादव &lpar;दूरदृश्य प्रणालीद्वारे&rpar;&comma; महिला व बालविकास आयुक्त वर्षा लढ्ढा&comma; एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख&comma; उपसचिव आनंद भोंडवे&comma; उपायुक्त वर्षा पवार&comma; राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक&comma; सचिव वंदना जैन&comma; मुंबई जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार&comma; तसेच शिक्षण&comma; ग्रामविकास विभाग&comma; नगरविकास विभागाचे अधिकारी आणि युनिसेफचे प्रतिनिधी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version