नागपूर :- मागील पाच वर्षापासून आशीर्वाद नगर गार्डन क्लब द्वारे अनेक समाजसेवी उपक्रमासह दिवाळी स्नेह मिलन पर्व अंतर्गत सर्व जुन्या नवीन सुरेल गाण्यांची मैफिल घडवून आणली. कार्यक्रमाची सुरुवात कैलास तानकर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. वासंती काथोटे यांनी “गजाननाशी गणराया” ही गणेश वंदना सादर करून मैफिलीत रंग भरला स्वतः कैलास तानकर यांनी “प्रभू रामचंद्र कैयगये सियासे” या गाण्याने प्रेक्षकास आपल्या सुरेल आवाजाची उधळण केली. तर जेष्ठ नागरिकासाठी “ओ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही हे” हे गाणे गाऊन महिला पुरुष जेष्ठ नागरिकांना सामूहिक नृत्य करण्यास बाध्य केले. ममता बावणे यांनी “ज्योती कलश झलके” हे गाणे सादर करून मैफिल रंगवली अन्वर शेख यांनी “खिलते है गुल यहा मोहम्मद रफी फेम” के गाने वन्स मोर मिळविला. रोशनी सावरकर यांनी “कसा बेभान वारा” हे मराठी प्रेम गीत गाऊन तरुण व ज्येष्ठ नागरिकांना मंत्र मुग्ध केले .कल्पना बनसोड यांनी “सत्यम शिवम सुंदरम” हे गीत गाऊन संगीताची लय लूट केली सोबतच सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे आयोजक सिद्धू कोमजवार यांनी “जीवन के दिन छोटे सही हम बडे दिलवाले” या गाण्यांनी प्रेक्षकाला आश्चर्याचा धक्का दिला. संध्या कुकडे यांनी मराठी भावगीत सादर केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजीत वंजारी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते गिरीश पांडव, यांची उपस्थिती लाभली त्यांचे मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सिद्धू कोमजवार यांनी आपल्या प्रभागातील काही नवीन गायक यांना वाव देऊन त्यांना प्रकाशात आणले. अक्षरा हेंलुडे, यांनी नृत्य सादर करून लोकांची मने जिंकले. तसेच रूपा हेलुंडे, मोहन मिरासे, विलास कठाने, शुभम मोरांडे व यांनी गाणे गाऊन लोकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे संयोजक सिद्धू कोमजवार तसेच आयोजक आशीर्वाद नगर गार्डन क्लबचे सर्व सदस्य वामनरावजी साळवे, विजय कडू, प्रकाश पाचभाई, हरीष कोठेकर, विलास धिरडे, प्रकाश काळबांडे, विलास इटनकर, विजय भगत, प्रल्हाद शेंडे, प्रभाकर कुकडे, मधुकर ठाकरे, गुणवंत भोयर, भानुदास खेडकर, धनराज आकोटकर, अरुण परसापुरे, पुरुषोत्तम तातोडे, नामदेव नावाडे, नरेंद्र भुसारी, राजकिशोर कुशवाह, सहदेव मेटेकर, नरेश बोकडे, रमेश पाटील, डायाभाई मेहरे,दिगांबर पिंपळकर, गोविंद सालपे, श्याम कामत, यांच्या विशेष सहकार्यातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कैलास तानकर यांनी केले तर आभार सुभाष गुजर यांनी मानले




