spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान येथे १५ ऑगस्टला भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

कन्हान :- भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था कन्हान यांच्या वतीने शनि वार (दि.१५) ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तारसा चौक, महाकाली कॉम्प्लेक्स कन्हान येथे होणार आहे.

यंदा संस्थेच्या १० व्या स्वतंत्र दिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिरातुन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर नगरसेवक यानी केले आहे. “रक्ताचा आहे थेंब मौल्यवान, याची असावी सर्वांना जाण, म्हणुनच करावे रक्तदान” असा संदेश देत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यमंत्री आ. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. तसेच कन्हान ठाणेदार वैजयंती मंडवधरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भव्य रक्तदान शिबिरासाठी विविध सामाजिक संस्था व संघटनांचे विशेष सहकार्य लाभत असुन डागा स्मृती शासकीय स्त्री प्रसुती रुग्णालय, नागपुर यांच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात येणार आहे. भव्य रक्तदान शिबीराच्या यशस्वितेकरिता भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर (नगरसेवक), तर उपाध्यक्ष समशेर पुरवले, भरत चकोले व हरीश तिडके, सचिव रजनीश (बाळा) मेश्राम, सहसचिव अशोक नारनवरे, कोषाध्यक्ष सुनील लक्ष्मणे, सहकोषाध्यक्ष दीपक कुंभलकर, आशिष वानखेडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य आदी परिश्रम करित आहेत.

“रक्तदान… सर्वश्रेष्ठ दान” या संदेशासह नागरिकां नी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles