spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री गजानन विजय ग्रंथ भव्य सामूहिक पारायणाचे आयोजन जैन कलार समाज भवनात गुरुवारी

नागपूर :- जैन कलार समाज ज्येष्ठ नागरिक मंडळ व आपुलकी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक ज्येष्ठ व पुरुषोत्तम मासा निमित्ताने श्री गजानन महाराजांच्या भक्तांसाठी ‘श्री गजानन विजय ग्रंथ भव्य सामूहिक पारायण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम गुरुवार, दि.११ जून रोजी, जैन कलार समाज भवन, रेशीमबाग येथे संपन्न होणार आहे. श्री संत गजानन महाराजांच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी व आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता. श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ व्या,* अध्यायाच्या सामूहिक पारायणाने होईल. त्यानंतर सायंकाळी ५.४५ ते ६.३० या वेळेत श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या हरिपाठाचे पठण केले जाईल. तसेच शेगावच्या परंपरेप्रमाणे श्री संत गजानन महाराजांची महाआरती सायंकाळी ६.३० ते ७ या वेळेत संपन्न होईल. लगेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. गजानन महाराजांचे भक्त, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व समाज बांधवांनी या आध्यात्मिक सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आयोजकांनी म्हटले आहे. कार्यक्रमासाठी पुरुष भक्तांनी पांढरा पोशाख व पांढरी टोपी, तर महिला भक्तांनी पिवळी साडी परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रत्येकाने ‘गजानन विजय’ ग्रंथ व हरिपाठ पुस्तिका सोबत आणावी, असेही आयोजकांनी कळविले आहे. या सामूहिक पारायणामुळे भक्तिमय वातावरणात अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी भाविकांना लाभणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.