चंद्रपूर ०२ : २९ जुन रोजी फॉरेस्ट रेस्ट हाऊस चंद्रपूर मध्ये संपन्न झाली. या मिटींगला विदर्भातून समाजसेवक व नेते मंडळी उपस्थित झाले होते. राष्ट्रीय खैरे कुणबी समाजाचा संघटनेच्या मार्फत सर्वांगीण विकास करण्याचा उद्देश सामोर ठेवून सर्वांनी मार्गदर्शन केले. शिवशंकर मुंगटे यांनी समाजाची आर्थिक बाजु मजबूत करायची असेल तर लघुउद्योग निर्मिती करावा लागेल असे ते बोलले, प्रा.दिलीप चौधरी यांनी समाजासाठी मुला मुली करिता वस्तीगृह, अभ्यासिका, वाचनालय, उभारावा लागेल, असे ते बोलले शांतनू धोटे यांनी, युवा युतीने करिता बेरोजगार युवकांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे ते बोलले. व एका भव्य दिव्य मेळाव्याचा आयोजनही करू असे बोलले, सौ रत्नमालाताई भोयर यांनी महिला सशक्त सबलीकरण करून महिलांना स्वयंरोजगार बनविणे. यावर मार्गदर्शन केले. डी के आरीकर यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये राष्ट्रीय खैरे कुणबी समाजाच्या संघटना असायला पाहिजे असे ते बोलतो, सुनील जुवार यांनी गावोगावी कोण्या कोपऱ्यात समाजाच्या बांधवांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे असे ते बोलले. श्याम लेडे यांनी पाच वर्षात या संघटनेचे वेगळे चित्र बघायला मिळेल असे ते बोलले. राष्ट्रीय खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष गुनेश्वर आरीकर यांनी प्रत्येक जिल्ह्यातील अध्यक्षांच्या नियुक्त्या या दोन महिन्यांमध्ये करू अशी ते बोलले. बाबाराव भोयर महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात दौरा होईल असे ते बोलले. कल्पनाताई आरीकर यांनी महिलांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. सुधीर कोरडे यांनी सर्वांचे आभार मानले व संचालन श्याम लेंडे साहेबांनी केले.
राष्ट्रीय खैरे कुणबी समाज संघटनेच्या वतीने चंद्रपूर येथे बैठक संपन्न.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



