कामठी :- कामठी कौमी एकता (मंच सर्व दलीय ) पक्षाच्या वतीने गाईला राष्ट्रीय (प्राणी) पशु घोषित करण्याच्या मागणीसाठी देशाचे राष्ट्रपती यांचे नावाने कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन दिले.
कामठी कौमी एकता मंचचे मार्गदर्शक प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव हाजी शकूर नागांनी यांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली हजारोच्या संख्येने उपस्थित असलेला मोर्चा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार गणेश जगदाळे यांना देशाचे राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्या नावे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,सर्व धर्मातील नागरिक गोमातेचे मोठ्या आस्थेने पूजा अर्चना करीत असतात गोमाता सर्वांचे श्रद्धास्थान बनले आहेत तरी गोमातेला राष्ट्रीय पशु (प्राणी) घोषित करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष हाजी शकूर नागांनी ,हाजी मोहम्मद असलम अंसारी , एकता मनच सचिव मोहसीन जमाल ,गुरुद्वाराचे लगवीर सिंग सोहर , भंते डॉक्टर बुद्ध रत्न संबोधी महाथेरो, ,नगरसेवक अभिषेक चिमणकर ,नितेश यादव,राजकुमार गेडाम,कृष्णा यादव ,अजबराव उईके, ,सोमेश जेटली ,नरेश यादव, इक्बाल बाबू कुरेशी , इरसाद कुरेशी, विपिन गायकवाड, डॉ रवीकुमार चंद्रिकापुरे, अशोक भीमटे, मोहम्मद फैजल, रेहान कौसर, मनीष गजभिये, मोहम्मद अमीर, रियाज अहमद ,मोहम्मद निजाम ,इम्तिशा अहमद ,जमाल कासी सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांचे मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.








