कामठी :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येरखेडा नगर पंचायत परिसरात भारतीय जनता पार्टी, येरखेडा यांच्या वतीने अध्यक्ष राकेशजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून येरखेडा नगर पंचायतचे अध्यक्ष राजकिरणजी बर्वे, उपाध्यक्षा रंजना काळे, बांधकाम सभापती मनीष कारेमोरे, स्वच्छता सभापती नरेश मोहबे, नगरसेविका योगिता काळे, शितल मथुरे, मनीषा गोंडाने, नगरसेवक सुशांत सलाम, मनोज बडवाईक, महिला मोर्चा अध्यक्षा राजश्री घिवले, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षल पोटभरे, सरिता भोयर, बंडीवार काकू, प्रशांत काळे, पिंटूजी मथुरे, मनीष भाटी, आसिफ पठाण, तुषार ढबाले, कुणाल गड्डमवार, आयुष कनोजिया तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.








