spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सोंडो गावाजवळ महामार्गावर भीषण अपघात

– तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील चार महिलांचा जागीच मृत्यू, चालकाला लागलेली डुलकी ठरली जीवघेणी

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ महामार्गावर भीषण अपघातात चार महिलांचा मृत्यू झालाय. या सर्व महिला तेलंगणा राज्यातील कागजनगरच्या असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली असून चालकाला लागली डुलकी जीवघेणी ठरली आहे. कागजनगर येथील काही लोक कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. हा कार्यक्रम आटोपून सर्वजण बोलेरो वाहनाने तेलंगणाकडे निघाले असताना पहाटेच्या सुमारास एका पुलावर चालकाला डुलकी आल्याने हे वाहन पुलाखाली कोसळले. या अपघातात वाहनातील पाच गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून यातील चालक मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. मृतांमध्ये अफजल बेगम वय 55, सायरा बानो वय 45, सबरीन शेख वय 13,सलमा बेगम झांकीर हुसेन वय 46  आदींचा समावेश आहे. सर्व जखमींना नागपूरच्या रुग्णालयात रवाना करण्यात आले असून घटनास्थळी स्वतः पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.

Popular Articles