spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नातवंडांच्या यशाचा अनोखा कौतुक सोहळा उत्साहात संपन्न

नागपूर :- जेष्ठ नागरिक अरुण (आबा) चावरे यांनी आपल्या नातवंडांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित केलेला विशेष कौतुक सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. स्व.अर्चना चावरे यांच्या स्मृतींना उजाळा देत अरुण चावरे यांनी संपूर्ण कुटुंबाच्या उपस्थितीत हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. त्यांच्या मोठे पुत्र विशाल चावरे व सरिता चावरे, मधले पुत्र पवन चावरे व श्वेता चावरे, धाकटे पुत्र सागर चावरे व मिनल चावरे तसेच कन्या स्वप्ना व जावई अभय वड्याळकर यांच्यासह संपूर्ण कुटुंब या सोहळ्यात सहभागी झाले होते. दहावी-बारावी परीक्षेत तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या अर्चित, विभास,अदिती, तनुश्री, अदविका, मंजिरी व आस्मी या नातवंडांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी आबा गेल्या महिनाभरापासून नियोजन करत होते. सोहळ्याची सुरुवात सकाळी गणपती अभिषेक व पूजनाने झाली. संध्याकाळी फुलांच्या पायघड्या, बँड, इलेक्ट्रिक अनार आणि केक कापून नातवंडांचे भव्य स्वागत करण्यात आले. चावरे यांनी प्रत्येक नातवंडाला पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात सुमारे 80 नातेवाईक उपस्थित होते. यावेळी आबांनी नातवंडांविषयीचा अभिमान आणि प्रेम भावनिक शब्दांत व्यक्त केले. उपस्थित कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. चावरे, फुसे, वड्याळकर, शेटे तसेच इतर कुटुंबीयांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. आबांच्या नियोजनाचे व प्रेमळ उपक्रमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले. नातवंडांच्या यशाचा हा अनोखा कौतुक सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा ठरला.

Popular Articles