spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरात तलाव स्वच्छतेच्या जनजागरणाला प्रारंभ

– पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील तलाव व परिसराची सघन स्वच्छता

नागपूर :- पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील तलाव व परिसर स्वच्छ करण्याचा जागर आज (ता. 6) संपूर्ण शहरात राबविण्यात आला. शहरातील अंबाझरी तला्व, सोनेगाव तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव, गांधीसागर, बिनाकी मंगळवारी, व पोलीस लाईन टाकळी येथील तलाव व परिसराची सघन स्वच्छता करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर कचरा जमा करण्यात आला. ही मोहिम लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्त्यांच्या सहकार्याने सातत्याने सुरू ठेवण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला.

या मोहिमेत महापौर निता ठाकरे, आमदार प्रविण दटके, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती  शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्यासह संबंधित विभागातील झोन सभापती, नगरसेवकांनी स्वच्छतेच्या या जागरात सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच ग्रीन व्हीजल फाऊंडेशन, राज्य आपत्ती व्यवस्थापन (एसडीआरएफ), एनडीएस, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्विमिंग, जेडी स्पोर्टस फाऊंडेशनच्या कार्यकर्ते व जवानांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

अंबाझरी तलाव व परिसराची स्वच्छता मोहिम आज राबविण्यात आली. या मोहिमेत धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड, आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे, जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती दिव्या धुरडे, परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, नेहरुनगर झोन सभापती सीमा ढोमणे नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक योगेश पाचपोर, नगरसेवक विजय होले, नगरसेविका वर्षा चौधरी, योगिता तेलंग यांच्यासह मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्रीकांत वाईकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, झोन अधिकारी बासनकर, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता  मनोज गदरे, एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, ग्रीन व्हीजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, नॅशनल इस्टिंट्टूट ऑफ स्विमिंगचे डॉ. जयप्रकाश दुबळे, जेडी ,स्पोर्टस फाऊंडेशनचे जयंत दुबळे यांनी या मोहिमेत भाग घेतला.

अंबाझरीचे वैभव पुन्हा मिळवून देणार – महापौर

शहराच्या पर्यावरणात मोठी भूमिका बजावणाऱ्या या तलावांचे वैभव पुन्हा मिळविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी व प्रशासन लागलेले असताना या मोहिमेत नागरिकांनी सहभाग देऊन सामाजिक बांधिलकी दाखवून द्यावी, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले. अंबाझरी तलावात जलपर्णीचा विळखा झाला आहे. परंतु पर्यावरणासाठी घातक असलेली जलपर्णीचे पूर्ण उच्चाटन करण्यासाठी मनपा प्रशासन कामाला लागले असून येत्या काही दिवसातच ही संपूर्ण जलपर्णी काढून या तलावात पोहून राष्ट्रीय पातळीवर नाव कमविणारे जलतरणपटू घडविणार्या या तलावाचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महापौर निता ठाकरे यांनी केले.

नगरसेवक-नगरसेविकांनी घालून दिला आदर्श

पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरात सुरू असलेल्या तलाव स्वच्छतेसाठी नगरसेवक व नगरसेविकांनी स्वतः तलावात उतरून शहर स्वच्छतेच्या संकल्पाचा आदर्श घालून दिला. अंबाझरी तलावात पर्यावरणासाठी घातक जलपर्णीचे जाळे पसरलेले आहेत. मनपातर्फे ही जलपर्णी काढून टाकण्याचे प्रयत्न घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांमार्फत सुरू आहेत. आज तलाव स्वच्छतेच्या मोहिमेच्या निमित्ताने अंबाझरी तलाव स्वच्छतेचा उपक्रम होता. यात धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड, आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे, नगरसेवक योगेश पाचपोर, विजय होले, सुनील हिरणवार, नगरसेविका वर्षा चौधरी, यांनी अंबाझरी तलावात उतरून जलपर्णी काढून टाकण्याचे काम सुरू केले. यावेळी त्यांनी आपल्या कृतीतून सामाजिक बांधिलकीची जपणारे नगरसेवक असल्याचा आदर्श घालून दिला. यावेळी सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम यांनी सुद्धा जलपर्णी काढण्याच्या मोहिमेत हातभार लावला.

सोनेगाव तलाव स्वच्छता

सोनेगाव तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, विधी विशेष समिती सभापती निधी तेलगोटे, लक्ष्मीनगर झोन सभापती लक्ष्मी यादव, नगरसेवक ईश्वर ढेंगळे, माया हाडे, सुनील दांडेकर, वर्षा चौधरी, रितेश गावंडे, प्र.अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त  धनंजय जाधव, कार्यकारी अभियंता रवींद्र बुधाडे, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, कनिष्ठ अभियंता संदीप लोखंडे, उपअभियंता अभिजित नेताम,नितीन राठोड, अनिल मुठे, स्वच्छता निरीक्षक दिनकर गजभिये यांच्यासह स्वयंसेवी संस्था एक रस्ता फाउंडेशन, मनपा एनडीएस चमू इतर मनपाचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तलाव व परिसरातील स्वच्छता करून वृक्षारोपण केले.

गांधीसागर तलाव

मध्य नागपुरातील गांधीसागर तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मा. आमदार प्रविण दटके, सत्ता पक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, धंतोली झोन सभापती भारती बुंदे, नगसेविका कांचन चव्हाण, नगरसेवक मनोज साबळे, रमेश भंडारी, सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, उपअभियंता विवेक तेलरांधे यांच्यासह इतर नगरसेवक, मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, अग्निशमन दलाचे जवान, इतर अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तलाव व परिसराची स्वच्छता केली केले.

सक्करदरा तलाव

दक्षिण नागपुरातील सक्करदरा तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मा.महापौर श्रीमती निता ठाकरे, सत्ता पक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, जलप्रदाय विशेष समिती दिव्या धुरडे, उपसभपती विजय (पिंटू) झलके, नेहरुनगर झोन सभापती सीमा ढोमणे, नगरसेविका रजनी वानखेडे, वर्षा डोंगरे, तसनीम नियामत ताजी, ज्योती दवघरे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, सहायक आयुक्त विकास रायबोले, उपअभियंता प्रफुल्ल आसलकर, विभागीय स्वच्छता अधिकारी आनंद खोडास्कर, यांच्यासह मनपाचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, अग्निशमन दलाचे जवान, इतर अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तलाव व परिसराची स्वच्छता करून जनजागृती केली.

पोलिस लाईन टाकळी तलाव

पोलिस लाईन टाकळी तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मंगळवारी झोन सभापती  सीमा डवरे, इतर नगरसेवक, उपायुक्त अशोक गराटे, माजी नगरसेवक अरुण डवरे, कार्यकारी अभियंता  सुनील उईके, झोनल स्वच्छता अधिकारी प्रमोद आत्राम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, अग्निशमन दलाचे जवान, इतर अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तलाव व परिसराची स्वच्छता केली.

नाईक तलाव

नाईक तलाव येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी सतरंजीपूरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, नगरसेविका रेखा निमजे, नगरसेवक तुषार लारोकर, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता उज्वल धनविजय, उपअभियंता  प्रशांत वाघमारे, कर अधीक्षक डॉली शेख, स्वच्छता अधिकारी  मनोज खरे, तसेच मनपाचे सुधीर जनोरकर, नित्यानंद लंगोटे, यांच्यासह स्वयंसेवी संस्था प्राजक्ता महिला सहायिका बचत गट, अग्निशमन दलाचे जवान, इतर अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तलाव व परिसराची स्वच्छता केली.

Popular Articles