spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शांततेच्या शोधात सातासमुद्रापारचा तरुण कामठीत!

– अमेरिकेतील युद्धजन्य वातावरणातून विरक्ती; ड्रॅगन पॅलेसमध्ये १० दिवसांची खडतर विपश्यना

कामठी :- रशिया-युक्रेन, अफगाणिस्थान – पाकिस्तान आणि इस्रायल-अमेरिका – इराण अशा युद्धांच्या दाहकतेने संपूर्ण जग होरपळून निघत असताना, आधुनिक जगातील तणावापासून दूर राहून मनाची शांती मिळवण्यासाठी सातासमुद्रापारचा एक विद्यार्थी चक्क कामठीत दाखल झाला आहे. अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन’चा रॉन वेरेड या २४ वर्षीय विद्यार्थ्याने कामठी येथील जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ‘ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर’ मध्ये १० दिवसांचे निवासी शिबीर यशस्वीरित्या पूर्ण केले.

युद्धाच्या तणावातून ‘धम्म’ मार्गाकडे

सध्या जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तरुणाईच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होत आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहूनही, वैचारिक गोंधळ आणि मानसिक अस्वास्थ्यावर उपाय म्हणून रॉन याने भारतीय प्राचीन ‘विपश्यना’ पद्धतीची निवड केली. ६ मार्च ते १७ मार्च २०२६ या कालावधीत त्याने ड्रॅगन पॅलेस येथील केंद्रात ‘निवासी शिबीर’ पूर्ण केले.

मेडिकलचा विद्यार्थी, पण ध्यानाची ओढ

रॉन हा पेशाने ‘एमडी’ (वैद्यकीय) शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. विज्ञानाची कास धरतानाच मनाचे विज्ञान समजून घेण्यासाठी त्याने ड्रॅगन पॅलेस गाठले. विशेष म्हणजे, या १० दिवसांच्या शिबिरात त्याने कडक शिस्त पाळत मौन धारण केले होते. या शिबिरामुळे त्याला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.

कामठीचे नाव जागतिक नकाशावर

ड्रॅगन पॅलेस येथील विपश्यना केंद्र हे केवळ विदर्भासाठीच नव्हे, तर जगभरातील साधकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. अमेरिकेहून आलेल्या या विद्यार्थ्याने कामठीच्या पावन भूमीत येऊन ध्यानधारणा केल्यामुळे, कामठीच्या आध्यात्मिक महत्त्वात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Popular Articles