spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र व आधार संलगणिकरंण 20 मार्च पूर्वी करावे – तहसीलदार गणेश जगदाळे

कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या 15 सप्टेंबर 2025 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून आता लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये अनुदान थेट डीबीटीद्वारे देण्यात येत आहे.मात्र या अनुदानाचा लाभ मीळण्यासाठी लाभार्थ्याचे युआयडी कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) ऑनलाईन पोर्टलवर अद्यावत असणे आवश्यक असल्याचे माहिती कामठी तहसील प्रशासनाकडून देण्यात आली असून कामठी तालुक्यातील संबंधित लाभार्थ्यांनी आपले युआयडी कार्ड ,आधार क्रमांक व बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत कामठी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत 20 मार्च 2026 पूर्वी जमा करावी असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे यांनी केले आहे तसेच युआयडी पोर्टल वरून इ केवायसी करणे ही आवश्यक असल्याचे सांगितले.

दिव्यांग कल्याण विभागाच्या सामाजिक सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे यु आय डी कार्ड व आधार संलग्निकरण करण्याबाबत शासनाच्या 4 मार्च 2026 च्या पत्रानुसार निर्देश देण्यात आले आहेत यानुसार कामठी तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना अंतर्गत बहुतांश लाभार्थ्यांचे युआयडी व आधार संलग्निकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे या लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टल वर अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरू असून कोणताही दिव्यांग लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तहसील प्रशासनाने विशेष आवाहन केले आहे.

Popular Articles