Home Latest News भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना – मुंबई...

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना – मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार

0

<p><strong>&&num;8211&semi; जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> मुंबई उपनगराच्या भांडूप येथील महत्त्वाकांक्षी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली असून&comma; पर्यावरण संवर्धन&comma; जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे&comma; यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची माहिती&comma; मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड&period;आशिष शेलार यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड&period;शेलार यांनी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाची पाहणी केली&period; त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते&period; यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक आमदार मिहीर कोटेचा&comma; नगरसेवक प्रकाश गंगाधरे&comma; नगरसेविका हेतल गाला मोरवेकर&comma; दीपिका घाग आणि अधिकारी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्रात हा प्रकल्प प्रस्तावित असून&comma; भांडूप पंपिंग स्टेशनलगत ठाणे खाडीच्या किनारी सुमारे २०&period;०९ हेक्टर क्षेत्रात त्याची उभारणी करण्यात येणार आहे&period; यापैकी केवळ ०&period;३५ हेक्टर क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक व कमी हस्तक्षेपाच्या तत्त्वावर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या परिसरात कांदळवन परिसंस्था&comma; दलदलीचे अधिवास&comma; खारफुटी क्षेत्रे तसेच स्थानिक व स्थलांतरित सुमारे २५० विविध जातीच्या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे&period; प्रकल्पामध्ये पक्षीनिरीक्षण केंद्रे&comma; पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा&comma; हरित क्षेत्र विकास&comma; नैसर्गिक अधिवास संवर्धन&comma; पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा आणि पर्यावरण जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत&period; त्यामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास&comma; जैवविविधतेला चालना मिळण्यास&comma; पर्यटन विकासास गती मिळण्यास तसेच स्थानिक नागरिकांसाठी विरंगुळा व पर्यावरण शिक्षणाचे प्रभावी केंद्र उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री ॲड&period; शेलार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रकल्पामध्ये २&period;१६ किलोमीटर लांबीचा मॅग्रोव्ह नेचर ट्रेल&comma; पक्षी निरीक्षण केंद्रे&comma; व्ह्यूइंग डेक्स&comma; बहुमजली वॉच टॉवर्स&comma; बटरफ्लाय गार्डन&comma; जेट्टी&comma; नेचर इंटरप्रिटेशन सेंटर व व्याख्यानगृह&comma; बाह्य पार्किंग सुविधा तसेच इतर पर्यावरणपूरक पर्यटन घटकांचा समावेश करण्यात आला आहे&period; प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे साहित्य व नियोजन परिसंस्थेला कमीत कमी बाधा पोहोचेल&comma; अशा पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित असेल&period;<&sol;p>&NewLine;<p>भांडूप पक्षी उद्यान हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता &lpar;एआय&rpar; आधारित पक्षी शोध व निरीक्षण प्रणाली असलेले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे&period; सुमारे १&period;५ किलोमीटर परिसरात रिअल-टाईम पक्षी निरीक्षण&comma; एआय आधारित पक्षी ओळख प्रणाली&comma; स्वयंचलित ट्रॅकिंग&comma; इव्हेंट ॲनालिटिक्स&comma; रेकॉर्डिंग&comma; प्लेबॅक आणि जैवविविधता दस्तऐवजीकरण यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत&period; तसेच डिजिटल लेन्स इंटिग्रेशन&comma; केंद्रीकृत डेटा व्यवस्थापन&comma; लाईव्ह सिंक्रोनायझेशन आणि परस्परसंवादी डिजिटल प्रणालीमुळे देश-विदेशातील पर्यटक&comma; संशोधक&comma; पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठरणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे&period; तसेच महाराष्ट्र इको-टुरिझम बोर्डाची मान्यता&comma; पर्यावरण&comma; वन व हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक सीआरझेड मंजुरी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची तांत्रिक मान्यता देखील प्राप्त झाली आहे&period; यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून ४५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड&period; शेलार यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन&comma; जैवविविधता संरक्षण&comma; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत पर्यटन यांचा प्रभावी संगम साधला जाणार असून&comma; मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पर्यावरणीय व पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे&comma; असेही मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड&period;शेलार यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version