Home Latest News तरुणांची माथी भडकवून देश पेटवण्याची संजय राऊतांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही

तरुणांची माथी भडकवून देश पेटवण्याची संजय राऊतांची इच्छा कधीही पूर्ण होणार नाही

0

<p><strong>&&num;8211&semi; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong>देशातील राष्ट्रभक्त तरुण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे&period; दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनात पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई केलेली आहे&period; स्टार्टअप किंवा मेक इन इंडिया असो&comma; यात तरुणाई सातत्याने मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे&period; त्यामुळे देशातील तरुणांची माथी भडकवून हा देश पेटवायची संजय राऊत यांची कितीही इच्छा असली तरी ती कधीच पूर्ण होणार नाही&comma; असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला&period; भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते&period;<&sol;p>&NewLine;<p>शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या डोक्यावरची भगवी टोपी काढून आंदोलन केले&period; आधी त्यांनी भगवे विचार काढून टाकले&comma; वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुडकावले&period; आता यांना भगवी टोपीही नकोशी झाली आहे&period; उद्धव ठाकरे&comma; संजय राऊत यांना बाजूला करत संपूर्ण नेतृत्व आपल्या हातात यावे&comma; अशी आदित्य ठाकरे यांची इच्छा आहे&period; मात्र शिवतीर्थावरील आंदोलनात भगवी टोपी झिडकारली त्यांना हिंदुत्ववादी लोक झिडकारल्याशिवाय राहणार नाहीत&period; नेतृत्व करायचे असेल तर भगवी टोपी घाला&comma; हिंदुत्ववादी विचार पाठीशी ठेवा आणि आंदोलन करा&period; मगच तुमचा पक्ष टिकेल&period; &OpenCurlyQuote;रामाची रक्षा करण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय’&comma; असे म्हणणारे उद्धव ठाकरे विसरले की संपूर्ण विश्वाची आणि भक्तांची रक्षा प्रभू रामचंद्र करत असतात&period; &OpenCurlyQuote;जो ना प्रभू राम का&comma; वो ना किसी काम का’ हे सगळ्यांना माहित असल्याने आपण आपल्या पक्षाच्या रक्षेचा विचार करा&period; अन्यथा त्या पक्षाची रक्षा नव्हे&comma; राख झाल्याशिवाय राहणार नाही&comma; अशा शब्दात बन यांनी फटकारले&period;<&sol;p>&NewLine;<p>दिल्लीतील आंदोलनावर न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य तो तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट करून बन म्हणाले&comma; या आंदोलनाच्या आडून संजय राऊत आणि उबाठा गट आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचा आणि राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत&period; रामरक्षा आंदोलनात संजय राऊत यांची फजिती उडाली&period; रामरक्षा आंदोलन करायला निघालेल्यांना रामरक्षा वाचताही आली नाही&period; अशी फजिती करून घेण्याची सवय संजय राऊतांना सातत्याने झाली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>संजय राऊत&comma; तुम्ही ईडीवरही मोर्चा काढला होता&comma; कारण भ्रष्टाचार करणे तुमची सवय आहे&period; ईडीचे दुखणे काय असते&comma; हे संजय राऊतांना जास्त माहिती आहे&period; पत्राचाळ घोटाळ्यात हजारो कोटी रुपये लुटल्याच्या आरोपावरून ईडीने तुम्हाला अटक केली होती&period; ईडीविरोधात लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे&comma; अशी तुमची इच्छा आहे&period; पण विनाकारण ईडीवर टीका करू नका&period; तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी लोकांसाठी ईडी हा एकमेव पर्याय आहे&period; जसा तुम्ही भ्रष्टाचार केला त्याचपद्धतीने तुमच्याकडून पै न पै वसूल केला जाईल आणि तुमच्या भ्रष्टाचाराचे कारनामे जनतेसमोर येतील&comma; अशी खरडपट्टी बन यांनी काढली&period;<&sol;p>&NewLine;<p>तुमच्या बाजूने निकाल लागले की सगळ्या यंत्रणा&comma; ईडी&comma; सीबीआय चांगले असते&period; केरळमध्ये काँग्रेस जिंकली की निवडणूक आयोग स्वायत्त आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपा जिंकली की निवडणूक आयोगावर शंका घायची&period; संजय राऊत हे दोन्ही बाजूने चालणाऱ्या गांडूळासारखे आहेत&period; हे गांडूळ उबाठा गट भुसभुशीत करून त्याचे अस्तित्व संपवण्याचे काम करत आहे&comma; हे महाराष्ट्राने ओळखले आहे&period; काँग्रेसची चड्डी घालून राहुल गांधींचा प्रचार करणाऱ्या संजय राऊतांनी आधी त्यांच्या चड्डीत काय घुसले ते पहावे&comma; असे बन यांनी सुनावले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version