spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

फेटरी येथील खुन प्रकरणातील आरोपी अटक

कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील फेटरी ओयो हॉटेल येथे एका युवतीचा खुन झाले प्रकरणी कलम १०३ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे सौरभ उर्फ बिट्टू जामगडे, वय २५ वर्ष, रा. आष्टी ता. कळमेश्वर, जि. नागपुर हा गुन्हा झाल्या पासुन मिळुन येत नव्हता.

सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेता हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि सागर खर्डे, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, सावनेर उपविभाग यांच्या मार्गदर्शनात कळमेश्वर पोलीसांसोबत स्थानिक गुन्हे शाखा यांनी सुध्दा तात्काळ सदर आरोपीचा शोध सुरू केला. सदर आरोपी शोध कामी एकुण ४ तपास पथके तयार करण्यात आली. यातील आरोपी हा घटने दिवशी दिनांक २२/०१/२०२६ रोजी पुणे येथे गेल्याची माहीती तपास पथकाला प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने २ तपास पथके पुणे येथे पिंपरी परीसरात आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना गुप्त बातमीदारकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, सदर आरोपी हा बिहार राज्यात गेला आहे. त्या दिशेने आरोपीचा शोध घेत असता दिनांक २९/०१/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी हा महालगाव, ता मौदा परीसरात असल्याबाबतच्या माहीती प्राप्त झाली, त्यावरून मौदा परीसरात शोध घेत असतांना आरोपी हा तेलंगणा एक्सप्रेस ने नागपुर ते दिल्ली कडे जात असल्याची माहीती प्राप्त झाली त्यावरून भोपाळ रेल्वे पोलीसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला असता भोपाळ येथे तेलंगणा एक्सप्रेस मध्ये आरोपी मिळुन आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.

कळमेश्वर पोलीसांनी सौरभ उर्फ बिट्टू जामगडे, वय २५ वर्ष, रा. आष्टी, ता. कळमेश्वर, जि. नागपुर याला अटक केले असुन पुढील तपास सुरू आहे. मा. न्यायालयाने नमुद आरोपीचा दिनांक ०४/०२/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला आहे.

Popular Articles