spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अतिरिक्त आयुक्तांनी घेतला घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या विविध योजनेंचा आढावा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी सोमवारी (ता.६) घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी लावण्यात आलेल्या फेस रेकग्निशन प्रणाली बद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सदर प्रणालीचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. तसेच प्रणालीचा वापर न करणाऱ्या कर्मचाऱ्यान कारवाई इशारा दिला.

बैठकीत मनपाचे उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे, राज चौधरी उपस्थित होते.

लोखंडे आणि राज चौधरी यांनी सांगितले की, या प्रणालीद्वारे किती कर्मचारी कामावर हजर आहेत, ही माहिती सहज उपलब्ध होईल. त्यांनी सांगितले की, लक्ष्मीनगर झोन, गांधीबाग झोन, मंगळवारी आणि हनुमान नगर झोन येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती चांगली असून लकडगंज, आशीनगर, धंतोली, आणि नेहरू नगर झोन येथे कमी आहे. झोनल स्वच्छता अधिकाऱ्यांनी या प्रणालीचा वापर करतांना येणाऱ्या समस्येची माहिती दिली.

Popular Articles