spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्ह्यातील चार आयटीआयमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांच्या वतीने दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी यवतमाळ, दारव्हा, घाटंजी आणि बाभूळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा/प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले आहे.

मॉडेल करिअर सेंटर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी संबंधित आयटीआय ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. मॉडेल करिअर सेंटर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी संबंधित आयटीआय ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

प्रमुख कंपन्यांचे सहभाग आणि रिक्त पदांची माहिती शासकीय आयटीआय, यवतमाळ आयडीएल जॉब प्लेसमेंट सर्व्हिसेस छ. संभाजीनगर,एलएपिएल ऑटोमोटीव्ह ली. छ. संभाजीनगर रिक्त पदे: अप्रेंटीसशिप ट्रेनी ६० जागा शासकीय आयटीआय, घाटंजी विदर्भ 1 क्लिक सोल्यूशन, चंद्रपूर सहयोग मल्टीटेस्ट क्रेडिट को-ऑप. सोसायटी, यवतमाळ रिक्त पदे: आयटीआय टेक्निशियन, हेल्पर, BDO, RO, BDO ऑफिसर ७३ जागा. शासकीय आयटीआय, दारव्हा टाटा मोटर्स, पुणे,बजाज प्रा. ली., पुणे, फियाट मोटर्स, पुणे,सहयोग मल्टीटेस्ट क्रेडिट को-ऑप. सोसायटी, यवतमाळ रिक्त पदे: ट्रेनी, सेल्स ट्रेनी, BDO, RO, BDO ऑफिसर – १०४ जागा शासकीय आयटीआय, बाभूळगाव सारा स्पिंटेक्स प्रा. ली., यवतमाळ सहयोग मल्टीटेस्ट क्रेडिट को-ऑप. सोसायटी, यवतमाळ रिक्त पदे: ट्रेनी, इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, BDO, RO, BDO ऑफिसर – ७१ जागा आहे.

हा मेळावा यवतमाळ जिल्ह्यातील चार प्रमुख आयटीआय केंद्रांवर एकाच दिवशी प्रथमच आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह स्वखर्चाने संबंधित केंद्रावर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी हजर राहून मुलाखत द्यावी, असे आवाहन सु.दि. उचले, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ यांनी केले आहे.

Popular Articles