spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो रुग्णांना लाभ

यवतमाळ :- नमो नेत्र संजीवनी अभियान पंधरवडा अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात जिल्हा अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांमध्ये एकूण २६७९ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीतून १५५४ रुग्णांना चष्म्याचे नंबर देण्यासाठी नोंदणी करण्यात आली.

जिल्हयातील सर्व तालुक्यातील ठिकाणी नियोजित तारखेप्रामाणे रुग्णांची नोंदणी, तपासणी, चष्म्याचे नंबर सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र येथील नेत्र चिकित्सा अधिकारी यांचे कडून करण्यात आली . सदर शिबिरा दरम्यान एकुण ४५६ मोतिबिंदु चे रुग्ण निघाले. सदर रुग्णांची श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ, आयुर्वेदिक महाविद्यालय यवतमाळ, उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा, पुसद, दारव्हा हया आय. ओ. एल. सेंटर ला जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रशांत चव्हाण, नेत्रतज्ञ डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. हर्षल येरकाडे यांनी नेत्र शस्त्रक्रिया केल्या.

सर्व रुग्णांना आवश्यकते प्रमाणे औषधी चष्म्याचे नंबर देण्यात आले व ३७२ मोतिबिंदु रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या. नमो नेत्र संजिवनी अभियान पंधरवडा यशस्वी करण्या करिता यवतमाळ, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, येथिल सर्व नेत्र चिकित्सा अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच या अभियाना दरम्यान नेत्रदान समुपदेशक सोनाली घायवान ह्यांनी नेत्रदानाची व अवयवदानाची जनजागृती करुन नेत्रदानाच १७८ व अवयवदानचे १५० संमतीपत्र भरून घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.