नागपूर :- भारतीय टपाल विभागातर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या प्रादेशिक स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धेत श्रीकृष्ण नृत्यालयची विद्यार्थिनी तथा प्रमिला उन्नीकृष्णन यांची शिष्या आदिती पाहुरकर हिने कनिष्ठ (ज्युनियर) भरतनाट्यम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. या उत्कृष्ट यशामुळे तिची आता पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय टपाल विभागाच्या नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदिती ही केंद्रीय विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी असून ती विशाल पाहुरकर व पूनम पाहुरकर यांची कन्या आहे. आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय तिने आपल्या गुरू प्रमिला उन्नीकृष्णन, शाळेतील शिक्षक-शिक्षिका तसेच आई- वडिलांना दिले आहे. आदितीच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही ती उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








