spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपा अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी आकाश मडावी यांची नियुक्ती

नागपूर :- भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती (एसटी) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नागपूरचे युवा कार्यकर्ते आकाश मडावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले आकाश मडावी यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सन २०२२ मध्ये राज्यसभा सदस्य माया इवानाते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या पश्चिम नागपूर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर २०२३ मध्ये तत्कालीन भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच नागपूर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या नागपूर महानगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ही जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे आणि यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्याची, सातत्यपूर्ण जनसंपर्काची, पक्षनिष्ठेची आणि कार्यक्षमतेची दखल घेत भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष देवराव होळी यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर आकाश मडावी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष देवराव होळी, राज्यसभा सदस्य माया इवानाते, संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, नागपूर शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी, प्रभारी किशोर काळकर, तसेच पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. यापुढे भारतीय जनता पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, अनुसूचित जमाती समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांना प्राधान्याने वाचा फोडणे तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम, गतिमान आणि बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचा विश्वास आकाश मडावी यांनी व्यक्त केला.

Popular Articles