spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोकण भवनात भारतीय स्वातंत्र्य दिन समारंभ पूर्व तयारीची बैठक संपन्न

नवी मुंबई :- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने आज पूर्व तयारीची बैठक कोकण विभागाच्या सामान्य शाखेच्या अपर आयुक्त फरोग मुकादम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

कोकण भवनातील पहिला मजला, समिती सभागृह येथे झालेल्या या बैठकीत पोलिस विभाग , वाहतुक पोलिस विभग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको अग्निशमन विभाग, उद्यान विभाग, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, रायगड विद्युत विभाग, बृहन्‌मंबई राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्याक्ष तसेच कोकण विभागातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोकण विभागीय स्तरावरील भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 80 वा समारंभ दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 09.05 वाजता कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने बैठकीत मार्गदर्शन करताना श्रीमती मुकादम यांनी कोकण भवनातील सर्व विभागाने हा सोहळा यशस्वीरित्या व उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा करावा, असे सांगून सर्वांनी शासकीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे त्यांनी यावेळी सांगितले.

Popular Articles