spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ॲड. आनंद गंजीवाले यांना ‘विद्यावाचस्पती’ सन्मान

शिक्षण क्षेत्रामधिल  उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल
यवतमाळ ३१ : यवतमाळ शहरातील प्रसिद्ध गंजीवाले कॉमर्स ॲकॅडमी चे संचालक ॲड. आनंद  सुधाकर गंजीवाले यांना त्यांच्या बहुमोल शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावनधाम (मथुरा), उत्तर प्रदेश यांच्यातर्फे ‘विद्यावाचस्पती हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
२७ जुलै २०२५ रोजी होटल रेडीसन ब्लू, पश्चिम बिहार, नवी दिल्ली येथे पं. दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ द्वारा डॉ. इन्दुभूषण मिश्रा ,कुलपती , पं.दीनदयाल उपाध्याय हिन्दी विद्यापीठ यांच्या अध्यक्षते खाली आयोजित “राष्ट्रीय हिन्दी संगोष्ठी तथा सन्मान समारोहामध्ये राणीलक्ष्मीबाई केन्द्रीय कृषि विश्वविद्यालय, झाँसी चे पूर्व कुलपति  प‌द्मश्री डॉ. अरविन्द कुमार जी यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गंजीवाले कॉमर्स ॲकॅडमी ही संस्था गेली तिन  दशके यवतमाळ शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्रातील कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र या संघटनेचे कोषाध्यक्ष म्हणून देखील निवडण्यात आले आहे. या भूमिकेतून ते राज्यभरातील कोचिंग वर्गांचे सशक्तिकरण, शिक्षकांचे हक्क आणि गुणवत्ता वृद्धी या विषयावर सातत्याने काम करत आहेत.

Popular Articles