spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे आजपासून अखंड श्रीमद् भागवत व शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह 

किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर येथील श्री शंकर देवस्थान मंदिर येथे समस्त ग्रामवासियांच्या सौजन्याने नारायण टेकडी रामटेक येथील श्री संत छोटूची महाराज यांच्या प्रेरणेने अखंड श्रीमद् भागवत व शिवपुराण कथा ज्ञानयज्ञ सप्ताह ची सुरुवात मंगळवार (ता. 10 )पासून होणार असून कुही तालुक्यातील मुक्काम पोस्ट बोरी (नाईक) येथील भागवताचार्य ह भ प योगेश चकोले महाराज यांच्या वाणीतून सायंकाळी सात ते दहा पर्यंत कथेचे वर्णन होणार आहे.

मंगळवार (ता.10)ला दुपारी तीन वाजता घटस्थापना ,गुरुवार (ता.12) ला सकाळी साडेदहा ते चार पर्यंत श्री शंकर देवस्थान कमिटी चाचेर व अमन ब्लड बँक यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर, रविवार (ता. 15 )ला सकाळी रामधून, रामधुन करिता बंडू बावणे यांच्या श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, गजानन खंडाईत यांचा श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ, तुळसा आढाऊ यांच्या जय दुर्गा उत्सव भजन मंडळ, शालु गुड यांच्या शिवशक्ती भजन मंडळ, पुष्पा बिसणे, दुर्गा गडे यांच्या सावित्रीबाई फुले भजन मंडळ, जोगी साखरवाडे यांच्या दत्तगुरु भजन मंडळ, पूजा कावळे यांच्या अंबिका भजन मंडळ, नंदा तिजारे यांच्या नवदुर्गा भजन मंडळ, रोशनी दिसणे यांच्या श्री लक्ष्मीनारायण भजन मंडळ, शेखर देवगडे यांच्या गुरुदेव भजन मंडळ ,माधुरी खडसे व हिरामण काळबांडे यांच्या पंचकृष्ण भजन मंडळ ही भजन मंडळी सहभागी होणार आहेत. सोमवार (ता. 16 )ला सकाळी सामुदायिक ध्यान, हवन पूजा व गावातून रामधुन त्यानंतर भागवत प्रवचन व पोथी पूजा मंगळवार (ता.17 )ला सकाळी ह भ प चकोले महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद. बुधवार 18 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता प्राक्षाळ पूजेने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान समस्त चाचेरवासीयांनी केले आहे.

Popular Articles