Home Latest News अकोल्याचा ‘कलासक्त योद्धा’ वैभव सांगळे यांची चित्रकला जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

अकोल्याचा ‘कलासक्त योद्धा’ वैभव सांगळे यांची चित्रकला जनपथ प्रदर्शनात ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

0

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> जन्मजात कर्णबधिरतेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने मात करत&comma; चित्रकलेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणारे अकोल्याचे सुपुत्र&comma; चित्रकार वैभव तानाजी सांगळे हे सध्या नवी दिल्लीतील जनपथ&comma; हँडलूम हाट येथे आयोजित &&num;8216&semi;स्पेशल एक्सपो&colon; सूत्रांचा प्रवास&&num;8217&semi; &lpar;द जर्नी ऑफ थ्रेड्स &rpar;मध्ये सहभागी झाले आहेत&period; वस्त्र मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित या सात दिवसीय प्रदर्शनात वैभव सांगळे यांच्या चित्रांतून साकारलेल्या &&num;8216&semi;भावस्पर्शी कलाविष्काराने&&num;8217&semi; अनेक कला रसिकांचे लक्ष वेधले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतीय पारंपरिक हातमाग आणि हस्तशिल्प कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या विशेष प्रदर्शनात देशभरातील ७५ विणकर&comma; स्वयं सहायता गट &lpar;SHG&rpar; आणि सहकारी संस्था भाग घेत आहेत&period; १६ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध राज्यांचे कलाकार आपापल्या क्षेत्रातील पारंपरिक वस्त्र आणि शिल्पकला प्रदर्शित करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रदर्शनात वैभव तानाजी सांगळे यांच्या स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळत असून&comma; त्यांच्या पोट्रेट्स&comma; निसर्ग चित्र&comma; ग्रामीण जीवन आणि वारली पेंटिंग्जमध्ये आढळणारी &&num;8216&semi;प्रवाही आणि भावनिक अभिव्यक्ती&&num;8217&semi; ही कलाकृतींची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8216&semi;कलासक्त योद्धा&&num;8217&semi; वैभव सांगळे&colon; प्रेरणादायी प्रवास आणि सर्वोच्च सन्मान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>वैभव सांगळे यांना त्यांच्या अदम्य जिद्द आणि कलेच्या सामर्थ्यावर कर्णबधिरतेवर मात करून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सन २०२३ चा &&num;8216&semi;राष्ट्रीय सर्वश्रेष्ठ दिव्यांग जन पुरस्कार&&num;8217&semi; जाहीर झाला होता&period; केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने गेल्या ३ डिसेंबर २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विज्ञान भवन&comma; दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते&period; हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी आपल्या अनाथ&comma; अपंग&comma; दिव्यांग बांधवांना&comma; सीमेवरच्या जवानांना&comma; बळीराजांना&comma; डॉक्टरांना&comma; गुरुजनांना&comma; शास्त्रज्ञांना आणि कष्टकऱ्यांना समर्पित केला होता&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>संघर्षातून साकारलेले शिक्षण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जन्मतः कर्णबधिर असल्याने चौथ्या वर्षापर्यंत बोलता-ऐकता न येणाऱ्या वैभव यांचे कर्णबधिरत्व त्यांच्या आई-वडिलांच्या &lpar;स्वतः स्पीच थेरपी शिकून&rpar; अथक प्रयत्नांमुळे ७०&percnt; पर्यंत कमी झाले&period; वयाच्या चौथ्या वर्षापासून वडिलांनी हातात पेन्सिल-ब्रश देऊन चित्रकलेची आवड निर्माण केली&period; अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी दहावी-बारावीत प्रथम क्रमांक मिळवला आणि चित्रकलेच्या सीईटी परीक्षेत अपंगातून प्रथम येऊन मुंबईतील प्रतिष्ठित सर जे&period;जे&period; स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आंतरराष्ट्रीय स्तरावर कलेचा गौरव&colon;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>वैभव यांच्या कलाकृतींनी सातासमुद्रापार मजल मारली असून&comma; इंग्लंड&comma; अमेरिका&comma; कॅनडा&comma; जर्मनी&comma; रशिया&comma; फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये त्यांची कला पोहोचली आहे&period; अमेरिकन दूतावास&comma; मुंबई येथे त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या &&num;8216&semi;दिव्य कला प्रदर्शनी&&num;8217&semi;त निवड झाल्यानंतर&comma; भारत सरकारच्या &&num;8216&semi;दिव्य कला मेळाव्यां&&num;8217&semi;मध्ये दिल्ली&comma; मुंबई&comma; भोपाळ&comma; गोवा&comma; गुहाटी अशा विविध शहरांमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते&comma; ज्यात मुंबई येथे त्यांना &&num;8216&semi;बेस्ट डिस्प्ले अवॉर्ड&&num;8217&semi; मिळाला होता&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>राष्ट्रपती भवनात विशेष सन्मान<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>एकाच वर्षात राष्ट्रपती भवनाकडून दोनदा सन्मानित होण्याचा दुर्मीळ मान वैभव यांना मिळाला&period; त्यांनी काढलेले राष्ट्रपती महोदयांसाठीचे खास पेंटिंग राष्ट्रपती भवनात लावण्यात आले असून&comma; त्यांच्या चित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शनही राष्ट्रपती भवनात भरवण्यात आले होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सामाजिक बांधिलकी आणि समर्पण<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>कर्णबधिर बांधवांना&comma; ग्रामीण भागातील महिलांना तसेच जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मोफत प्रशिक्षणाची इच्छा बाळगणाऱ्या वैभव यांनी समाजाप्रती आपले कर्तव्य मानून अनेक अनाथ आश्रमांमध्ये आणि दिव्यांग बांधवांना निशुल्क पेंटिंगचे प्रशिक्षण दिले आहे&period; अकोला जिल्हा परिषदेच्या महिलांच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणामध्ये त्यांनी वारली पेंटिंग्जचे प्रशिक्षण दिले होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version