नागपूर :- दीक्षाभूमी नागपूर येथील डॉ. आंबेडकर ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी अक्षदा इंगळेकर यांची २ ते ८ जानेवारी २०२६ रोजी भिलवाडा, राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील १९ वर्षांखालील बास्केटबॉल संघासाठी निवड झाली.
डॉ.आंबेडकर ज्युनियर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल संघाने १० ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला. अक्षदा नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करते आणि उत्कृष्ट खेळली. तिच्या खेळातील उत्कृष्टतेमुळे, तिला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवडण्यात आली.
परम पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, सचिव आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सर्व कार्यकारिणी सदस्य, तसेच प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर , एच.ए.बोरकर उपप्राचार्य व सर्व कर्मचारी, पर्यवेक्षक प्रा.कुणाल पाटील व सर्व सदस्य, सहकारी सदस्यांनी अक्षदाच्या भावी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.








