पांढरकवडा :- स्थानिक युवा राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज बी.एड. (महिला) कॉलेज,पांढरकवडा येथे 12 जानेवारी रोजी मराठी अभ्यास मंडळाच्या वतीने अक्षरधारा भित्तीपत्रकाचे मोठ्या थाटामाटात विमोचन झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.शेखर खिस्ती उपस्थित होते. महाविद्यालयाचे संचालक श्याम अरके यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थींनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा आढावा विविध लेख व कवितेच्या माध्यमातून घेतला. सदर भित्तीपत्रकामध्ये प्रीती रोडे,राणी निलगिरवार, पायल कुंभारे,सारिका आत्राम,धनश्री बंदे, सारिका तोडगे इ.प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. सहाव्या “अक्षरधारा “भित्तीपत्रकाचे संपादन वेदांती काकडे यांनी केले. संपादकीय लेखातून वेदांती काकडे यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे विचार अलीकडील काळात किती महत्वाचे आहे ते सांगितले.सदर भित्तीपत्रकासाठी प्रा. डॉ. सारिका निकम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ.अंशू साहू, डॉ. सुजया बीजवे, प्रा.बालाजी राठोड,प्रा.राहुल पाईकराव,प्रा.पंकज आगलावे, प्रा. निलमणी मनवर, ,प्रा. जप्पिंदरकौर कानसे,प्रा. जान्हवी भोयर, नलिनी करपते, प्रा. सुषमा ठाकरे व समस्त शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते.








