– गणेशोत्सवानंतर शिल्लक रकमेतून केले चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक:- किट्स महाविद्यालयातील तरुणांचं श्री सिद्धिविनायक गणेश उत्सव मंडळ हे दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करत असते. २०२५ सालचा गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केल्यानंतर या मंडळाकडे काही रक्कम शिल्लक राहीली होती, तेव्हा मंडळातील सदस्यांनी आपले सामाजिक भान जोपासत व माणुसकिचे उदाहरण देत शिल्लक राहिलेल्या रकमेतून रामटेक पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खनोरा ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखापुर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानोरा येथील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अशी स्कूल बॅग, वॉटर बॉटल तथा सर्व साहित्यासह कंपास बॉक्स,नोटबुक व खाऊंचे वाटप केले. उल्लेखनिय म्हणजे शिल्लक रकमेतून काय करावे असा प्रश्न समोर आल्यावर मंडळातील सर्व तरुणांनी सामाजिक भान जोपासण्याचा निश्चय मनाशी पक्का केला होता व उरलेल्या पैशातून ग्रामीण भागातल्या चिमुकल्या बालगोपालांच्या शिक्षणाला मदत व्हावी असं काहीतरी करण्याचे मंडळाचे अध्यक्ष ओजस असतुनकर व हर्ष धामट यांनी सुचवले. या तरुणाईने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत राबवलेला उपक्रम हा निश्चितच स्तुत्य असून लाखापुर व खनोरा येथील शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांमार्फत सर्व युवकांचे कौतुक करण्यात आले. व आभारही माणन्यात आले. ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांचाही याप्रसंगी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ व मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानोरा येथील मुख्याध्यापक दीपक बोरसे व सहाय्यक शिक्षक मंगेश काळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सदर कार्यक्रमाला ओजस अस्तुनकर, शिवम जेजल, हर्ष धामट, भावेश कुरेकर,क्रिश वासनिक, मोहित पाणतावणे, कृष्णा रेवस्कर, विशाल पिंपळकर, ऋषिकेश आंबेपवार, अभय पटले, रितिक आखरे, सुजल धोटे,आशिष येतकर, अभिनीत अवसरमोल, इशान कठणे, क्षितिज धावले, आर्यन अहिरकर आदी मान्यवर उपस्थित होते.




