spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बेपत्ता ७ वर्षीय मुलाचा तात्कळ घेतला शोध, काटोल पोलीसांची कामगिरी

 

नागपुर ०९ : सागर दिलीपराव गजम, रा जामगाव, ता. नरखेड, जि. नागपुर हे त्यांचा मुलगा शौर्य, ७ वर्षे याला सोबत घेवुन काटोल येथे मोहरम सणाची सवारी बघण्याकरीता गेले होते. गर्दीमध्ये शौर्य हरविल्याबाबत माहीती सागर गजम यांनी पोलीसांना दिली. अशी माहीती मिळताच पोलीस निरीक्षक  रंजीत शिरसाठ, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन काटोल यांनी तात्काळ सदर मुलाचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार करून रवाना केले. तसेच ते स्वतः सुध्दा सदर मुलाला शोधण्यासाठी रवाना झाले. गुप्त बातमीदार कडे माहीती काढण्यात आली तसेच सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्यात आले. काटोल पोलीस सदर मुलाचा शोध घेत असतांना सदर मुलगा हा बस स्टैंड, काटोल परीसरात सायकल चालवित असातांना मिळुन आला. पोलीसांनी त्याला विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मोहरम पाहत असतांना तो रस्ता चुकला होता. अंदाजाने तो त्याच्या आजीच्या घरी गेला होता. पोलीसांनी सदर माहीतीची शाहनिशा केली माहीती बरोबर असल्याची पोलीसांना खात्री पटली. त्यानंतर त्यांनी शौर्य चे वडील सागर दिलीपराव गजम यांना व्हिडीओ कॉल करून संपर्क केला. त्यावेळी शौर्यचे वडील यांनी भावनिक होवुन पोलीसांचे आभार मानले. सदर मुलाला त्याचे वडील सागर दिलीपराव गजम, रा जामगाव ता. नरखेड जि. नागपुर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रंजीत शिरसाठ, प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन काटोल,  जवाहर चव्हाण, पोउपनि, सफौ बावणे आणि पोलीस अंमलदार हेमराज कोल्हे यांनी कोशिशीने बेपत्ता मुलाचा तात्काळ शोध घेतल्याने मुलगा शौर्य सागर गजम, वय ६ वर्षे मिळुन आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.