spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपुर ग्रामीण जिल्हयातील ५९० रेकॉर्डवरील आरोपीतांची घेण्यात आली आरोपी परेड

 

नागपुर ०९ :  हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक ०८/०७/२०२५ रोजी नागपुर ग्रामीण जिल्हयातील सर्व २२ पोलीस स्टेशनला शरीराविरुध्दचे गुन्हे करणारे, मालमत्ते विरुध्दचे गुन्हे करणारे, महीला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू, जुगार इतर अवैध धंदयामधील रेकॉर्डवरील आरोपीतांची आरोपी परेड घेण्यात आली आहे. एकुण ५९०आरोपीतांची आरोपी परेड घेण्यात आली आहे.
नागपुर उपविभाग नागपुर उपविभागातील पोलीस स्टेशन बोरी येथे ३८ आरोपी पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी येथे ३० आरोपी आणि पोलीस स्टेशन बेला येथे ३३ आरोपी अशा एकुण १०१ रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली आहे. उमरेड उपविभाग उमरेड उपविभागातील पोलीस स्टेशन उमरेड येथे ३० आरोपी पोलीस स्टेशन कुही येथे २६ आरोपी आणि पोलीस स्टेशन भिवापुर येथे १८ आणि पोलीस
स्टेशन वेलतुर १६ आरोपी अशा एकूण ९० रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली आहे.
सावनेर उपविभाग सावनेर उपविभागातील पोलीस स्टेशन सावनेर येथे ३२ आरोपी पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे २२ आरोपी आणि पोलीस स्टेशन खापा येथे २७ आरोपी आणि पोलीस स्टेशन केळवद येथे २५ आरोपी अशा एकुण १०६ रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली आहे.
कन्हान उपविभाग
कन्हान उपविभागातील पोलीस स्टेशन कन्हान येथे ३० आरोपी पोलीस स्टेशन मौदा येथे २९ आरोपी आणि पोलीस स्टेशन खापरखेडा येथे ३३आरोपी अशा एकुण ९२ रेकॉर्डवरील आरोपीची आरोपी परेड घेण्यात आली आहे.
रामटेक उपविभाग
रामटेक उपविभागातील पोलीस स्टेशन रामटेक येथे १९ आरोपी पोलीस स्टेशन पारशिवणी येथे २४ आरोपी, पोलीस स्टेशन अरोली येथे १४ आरोपी आणि पोलीस स्टेशन देवलापार येथे येथे १९ आरोपी अशा एकूण ७६ रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली आहे.
काटोल उपविभाग काटोल उपविभागातील पोलीस स्टेशन काटोल येथे ३४ आरोपी
पोलीस स्टेशन कोंढाळी येथे २६ आरोपी आणि पोलीस स्टेशन नरखेड येथे ३६ आरोपी आणि पोलीस स्टेशन जलालखेडा येथे २९ आरोपी अशा एकुण १२५ रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली आहे.
सर्व ६ उपविभागातील सर्व २२ पोलीस स्टेशन एकुण ५९० रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली आहे.

Popular Articles