सावनेर ०९ : दिनांक ०७/०७/२०२५ चे २३:०० वा. ते दिनांक ०८/०७/२०२५ चे ०५:०० वा. दरम्यान जिल्हा गस्त मध्ये अनिल म्हस्के, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, सावनेर विभाग यांनी संपुर्ण जिल्हयात सतर्कपणे गस्त केली. तसेच पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत सटवामाता मंदीर, पहीलेपार आणि वाघोडा येथे पायदळ पेट्रोलींग करून कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर कोबिंग ऑपरेशन अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात राबविण्यात आले असुन रेकॉर्डवरील गुन्हेगार, जेल रिलीज गुन्हेगार, निगराणी बदमाश तसेच अवैध दारू विकेते गुन्हेगार चेक करून त्यांचे घराची पंचासमक्ष घरझडती घेण्यात आली. शिवाजी चौक, राजकमल चौक, गडकरी चौक, गांधी चौक येथे नाकाबंदी करून ९२ संशयीत वाहनांची तपासणी करण्यात आली. सदर कारवाईमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन सह दंगा नियत्रंण पथकाचे अंमलदार हजर होते.




