spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अनिल मस्के यांची नागपूर ग्रामीणचे अपर पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती; सावनेरमधील कामगिरीची मिळाली पावती

नागपूर ११ : अनिल मस्के यांची नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी सावनेर उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून जबाबदारी पार पाडली असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी सावनेर व कलमेश्वर परिसरातील अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

मस्के यांच्या कारकिर्दीत जुगार, बेकायदेशीर मद्यविक्री, रेती चोरी, कोळसा तस्करी यांसारख्या अवैध व्यवसायांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात आले. त्यांच्या कारवाईचा इतका प्रभाव होता की अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाचाही धसका होता.

त्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे अनेक गुन्हेगार भूमिगत झाले, तर काहींनी अवैध व्यवसायच बंद केला. त्यामुळेच त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे नागपूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शिस्तप्रियता, धाडसी निर्णयशक्ती आणि भ्रष्टाचारविरोधी स्पष्ट भूमिका यामुळेच त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणखी बळकट होईल, अशी जनतेत अपेक्षा व्यक्त होत आहे.

IPS सागर खर्डे सावनेरच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नियुक्त ; अवैध धंदेवाल्यांची झोप उडवणारा आणखी एक ‘धडाकेबाज DYSP’ दाखल

सावनेर पोलीस उपविभागाला आता आणखी एक कडक शिस्तप्रिय आणि कारवाईसाठी ओळखला जाणारा अधिकारी लाभला आहे. IPS अधिकारी सागर खर्डे यांची सावनेर उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या येण्यापूर्वीच अवैध धंदेवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सागर खर्डे हे आपल्या प्रोबेशनरी काळातच अनेक धाडसी आणि परिणामकारक कारवायांसाठी ओळखले गेले आहेत. गुन्हेगारीवर आक्रमक पवित्रा घेणं, स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांवर ताशेरे ओढणं, आणि कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता कायदा अंमलबजावणी करणे ही त्यांच्या कामाची खासियत राहिली आहे.

त्यांच्या या नव्या नियुक्तीची बातमीच जशी जिल्ह्यात पसरली, तसतसे सावनेर, कलमेश्वर, आणि आजूबाजूच्या परिसरातील अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे चालक, रेती-कोळसा तस्कर यांचं चुकचुकणं सुरू झालं आहे. काही ठिकाणी रातोरात अड्डे बंद करण्याची हालचाल सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे.

सावनेर उपविभागाच्या नेतृत्वात मागील काळात अनिल मस्के यांच्या कारवाईने गुन्हेगारी जगतात धसका निर्माण केला होता, आता सागर खर्डे यांच्याकडून त्याच परंपरेला नवा बळ मिळेल, अशी चर्चा पोलीस खात्यात आणि नागरिकांमध्ये सुरू आहे.

त्यांच्या नियुक्तीबाबत स्थानिक नागरिकांमध्येही समाधानाचं वातावरण असून, “सावनेरला पुन्हा एक ‘अ‍ॅक्शन DYSP’ मिळाला आहे”, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलीस दलाच्या आतल्या वर्तुळातही ही “खूपच योग्य नियुक्ती” असल्याचे बोलले जात आहे.

आता सगळ्यांच्या नजरा सागर खर्डे यांच्या आगामी कारवायांकडे लागलेल्या आहेत. कायदेशीर यंत्रणेला बळ देणाऱ्या आणि गुन्हेगारीला चाप बसवणाऱ्या निर्णयांची जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.