spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

नागपूर :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘ऑपरेशन थंडर’ अभियानांतर्गत अंबाझरी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने धरमपेठ झोन क्र. २ येथील मनपा समुपदेशन केंद्रात अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला धरमपेठ झोन क्र. २ च्या सभापती धनश्री देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिना बारंगे, समाज विकास विभागाच्या समूह संघटक अनिता वर्धट व समुपदेशन केंद्राच्या संचालिका नंदा कोल्हटकर उपस्थित होत्या. परिसरातील महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

यावेळी API मिना बारंगे यांनी अंमली पदार्थांचे वाढते व्यसन, त्याचे आरोग्य व समाजावर होणारे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करून संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन केले. नंदा कोल्हटकर यांनी महिला हक्क, कौटुंबिक कायदे व बालसंरक्षण विषयक माहिती दिली, तर धनश्री देशपांडे यांनी व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिता वर्धट यांनी केले. या उपक्रमामुळे अंमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण होऊन व्यसनमुक्त समाज घडविण्यास हातभार लागेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Popular Articles