नागपूर :- अखिल भारतीय भोयर पवार महासंघ नागपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक सत्कार तसेच युवक युवती परिचय मेळावा रविवारी १४ डिसेंबर रोजी, संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नामदेव राऊत तर उद्घाटक राष्ट्रीय क्षेत्रीय पवार महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदलाल चौधरी (छत्तीसगड) होते. प्रमुख अतिथी प्रा. हेमंत ढोले अध्यक्ष भोयर पवार विद्यार्थी मंडळ कारंजा, अनंत ढोले मिळकत व्यवस्थापक नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडल नागपूर, इंजि. विनायक मानमोडे, हेमंत पवार, बळवंत कडवे, डॉ. टीना देवासे (मानमोडे) डॉ. दीप्ती पराडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महासंघाची मुखपत्रीका वाटचाल २०२५ व युवक आघाडी तर्फे उपवर युवक युवती परिचय पुस्तिका भविष्याची वाटचाल २०२५ चे विमोचन करण्यात आले. तसेच समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य, नियुक्ती व शासकीय सेवेत पदोन्नती, सेवानिवृत्त झालेले डॉ. विजय पराडकर, श्रावण फरकाडे, चक्रधर डोंगरे, वामनराव भादे, जियालाल शरणागत, देवानंद टेंभरे, तुकाराम किनकर, श्यामकांत खवसे, भुमेश्वरी चोपडे, सी.ए.दिव्या ढोबाळे (ढोले) जगदीश चोपडे, विवेक धारपुरे, डॉ.अश्विनी देशमुख, आशुतोष देवासे, किरण घागरे तर पदवीधर अंकित बोबडे, प्रतीक बोबडे, पुष्पक फरकाडे, अबोली घागरे १० मध्ये अनुराग राधेश्याम पवार, प्रसन्या मोतीलाल चौधरी, तुषार प्रभाकर खवशी, भावना भोजराज हिंगवे, काव्या चेतन फरकाडे, वंशीका शैलेश घागरे, बारावी मध्ये नचिकेत प्रदीप बारंगे, गरिमा मदन कडवे, तेजस्विनी दिलीप शेरके, पलक मोहन खवशी, जानवी चित्तेश्वर ढोले, तन्वी मंगेश कडवे, जय संदीप कडवे, भास्कर रोशन राऊत, गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन व ज्येष्ठ नागरिक सत्कारसह वधू- वर परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी स्व.विठ्ठलराव चौधरी फाउंडेशन तर्फे निःशुल्क आरोग्य तपासणी डॉ. जयश्री चौधरी, डॉ.भाग्यश्री चोपडे व समूहतर्फे तसेच लाईफ लाईन ब्लड बँक तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव मोरेश्वर भादे तर आभार किशोर चोपडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मधुकर चोपडे, सुभाष पाठे, डॉ.उदय चौधरी, शंकर पाठेकर, ॲड. प्रभाकर डोबले, श्रावण फरकाडे, रामेश्वर चोपडे, नंदू ढोबळे, अरविंद देशमुख, महिला आघाडीच्या पुष्पा बीसेन कडवे, अर्चना खवसे, मंगला धारपुरे, अर्चना चोपडे सह यांनी परिश्रम घेतले. सचिव मोरेश्वर भादे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.








