नागपूर :- शिवसेना विदर्भ कार्यालय, धंतोली येथे दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी प्रभाग क्रं. 32 बजरंग नगर (ओपन) मधून इच्छुक उमेदवार म्हणून हितेश युवराज मुंदाफळे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज सुरज गोजे यांच्या जवळ दाखल केला. हा अर्ज शिवसेना पक्षाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष सूरज गोजे यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीत प्रभाग 32 मधून शिवसेनेला अधिक बळकटी देण्यासाठी मुंदाफळे यांनी दृढ निश्चय व्यक्त केला आहे.








