spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला प्रकरण: “भाजपचा कोणताही संबंध नाही” – बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

नागपूर १४ : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात खळबळ माजली असून, या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही, अशा शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला शाई फेकण्याचा प्रकार काल घडला होता. गायकवाड यांनी याबाबत गंभीर आरोप करताना “हा सरकार प्रायोजित हल्ला असून, आपल्याला जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता,” असे विधान केले होते. मराठा समाजासह विविध संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

या पार्श्वभूमीवर आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
“हल्लेखोर भाजपचा कार्यकर्ता असला, तरी आमचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. अशा खालच्या पातळीवरचा प्रकार करणे भाजपच्या रक्तातच नाही. पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि संबंधित आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे.”

बावनकुळे यांनी पुढे नमूद केले की,
“कोणताही आरोपी कुठल्याही पक्षाचा असो, तो आरोपीच असतो. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे की, अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या नेत्यांसोबत फोटो काढतात, त्यामुळे त्यांना पक्षाशी जोडणे चुकीचे आहे.”


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.