Home Latest News वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी

वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजूरी

0
xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

<p><strong>&&num;8211&semi; महावितरणकडून तत्पर ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक&comma; व्यावसायिक&comma; घरगुती व इतर ग्राहकांच्या 157 केडब्लूपर्यंत वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ झाला आहे&period; महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे&period; त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणी ग्राहकांनी नियमानुसार शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ 24 ते 48 तासांमध्ये मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर व कार्यान्वित होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना &OpenCurlyQuote;इज ऑफ लिव्हिंग’नुसार &lpar;राहणीमान सुलभता&rpar; सेवा देण्याची सूचना केली आहे&period; त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्र यांनी लघुदाब वर्गवारीतील सर्व ग्राहकांसाठी वीज भारात वाढ किंवा कमी करण्याची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे स्वयंचलित करण्याचे निर्देश दिले&period; त्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसीत करण्यात आली आणि दि&period; 17 सप्टेंबर ते दि&period; 2 ऑक्टोबरच्या सेवा पर्वाचे औचित्य साधून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सध्या अस्तित्त्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारामध्ये &lpar;Load Change&sol;Demand Change&rpar; करारापेक्षा आणखी वाढ करणे किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या www&period;mahadiscom&period;in संकेतस्थळावर किंवा मोबाइल अॅपवर ग्राहकांना स्वतःच्या लॉगीनद्वारे उपलब्ध आहे&period; मात्र मंजूरीची प्रक्रिया स्वयंचलित नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी बराच वेळ लागत होता&period; आता 157 किलोवॅटपर्यंतच्या वीज भाराच्या वाढीसाठी स्वयंचलित मंजूरी देण्यात येणार आहे&period; वीज भार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदविल्यानतंर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन देण्यात येईल&period; तर कोटेशनचे शुल्क भरण्याची देखील ऑनलाइन सोय आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>लघुदाब वर्गवारीमध्ये शून्य ते 7&period;5 किलोवॅट&comma; 7&period;5 ते 20 किलोवॅट आणि 20 ते 157 किलोवॅट असे वीजभाराचे तीन गट आहेत&period; या तिनही गटात वीज भार वाढीच्या मंजूरीसाठी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे&period; ग्राहकांना केवळ संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल व नियमानुसार शुल्क भऱावे लागेल&period; त्यापुढील सर्व प्रक्रिया महावितरणकडून स्वयंचलित पद्धतीने होणार आहे&period; त्याची माहिती संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>वीजग्राहकांनी आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर नवीन मीटर बसविण्याची किंवा पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसेल अशा नसेल&comma; अशा वीजजोडणीचा वाढीव वीज भार स्वयंचलित प्रणालीने मंजूर होईल व केवळ 24 तासांत कार्यान्वित होईल&period; वाढीव वीजभाराच्या आवश्यकतेनुसार किंवा सिंगलऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येते&period; अशा ठिकाणी नवीन वीज मीटर लावण्याचा आदेश स्वयंचलितपणे संबंधित एजन्सीला देण्यात येईल&period; त्यामुळे नवीन वीजमीटरची आवश्यकता असलेल्या ठिकाणी देखील साधारणतः 48 तासांमध्ये वीज भार वाढीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यासह ज्या वीजजोडणीचा करारापेक्षा अधिक वीज भार वाढविण्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे&comma; त्याठिकाणी महावितरणद्वारे पायाभूत यंत्रणा उभारण्यात येईल&period; त्याबाबत स्वयंचलितपणे निवडसूचीवरील संबंधित एजन्सीला कळविण्यात येईल&period; पायाभूत यंत्रणा उभारण्याचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येईल&period; या प्रक्रियेची माहिती वेळोवेळी संबंधित ग्राहकांना कळविण्यात येईल&period;<&sol;p>&NewLine;<p>लघुदाब वर्गवारीमध्ये वीज भार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजूरी देण्याच्या निर्णयामुळे महावितरणच्या ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे&period; त्याचा प्रामुख्याने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी घरगुती ग्राहकांना तसेच प्रामुख्याने औद्योगिक&comma; व्यावसायिक व इतर लघुदाब ग्राहकांना मोठा लाभ होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version