spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एकल महिला दिनानिमित्त झोन क्र.२ मध्ये जनजागृती व कायदेशीर मार्गदर्शन

नागपूर :- आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या झोन क्र.२ अंतर्गत समाज विकास विभाग व समुपदेशन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन २३ जून रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोन क्र. २ च्या सभापती धनश्री देशपांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी सभापती धनश्री देशपांडे यांनी आपल्या भाषणात एकल महिलांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले व चांगल्या पद्धतीने महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी समाज विकास विभागाच्या समूह संघटिका अनिता वरघट, समुपदेशन केंद्राच्या संचालिका नंदा कोल्हटकर तसेच समुपदेशन केंद्राचे अँड. सरोज मुन आदी मान्यवर उपस्थित होते. अँड.सरोज मुन यांनी एकल महिलांचे कायदेशीर हक्क, घटस्फोट, अविवाहित व विधवा महिलांना उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच समुपदेशन केंद्राच्या समुपदेशक अनिता वरघट हीने महिलांना शासकीय योजनांबाबत सविस्तर माहिती दिली तर नंदा कोल्हटकर यांनी कौटुंबिक कलह, घटस्फोट, घरगुती हिंसाचार, बालकांवरील अत्याचार याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमात एकूण ६३ महिलांनी सहभाग नोंदविला. उपस्थित महिलांसाठी बसण्याची तसेच चहा-नाश्ता व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या सरते शेवटी बबीता हिंगणेकर हिने आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular Articles